माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 20 November 2021

ओळखा पाहू मी कोण ?



(१) सुपासारखे माझे कान, 
शेपूट आहे फार लहान 
पाने, ऊस माझे जेवण, 
सांगा पाहू मी कोण ?

उत्तर :--- हत्ती.
----------------------------
(२) उंचाडी मान, फत्ताडे पाय 
वाकडी पाठ, डुगडुग जाय 
तुडवीत जातो वाळवंट 
सांगा  पाहू मी कोण?

उत्तर : ---- ‌उंट
----------------------------------
(३)कात नाही, चुना नाही, 
तोंड कसे रंगले?
पाऊस नाही, पाणी नाही,
रान कसे हिरवे ?
सांगा पाहू मी कोण ?

उत्तर : ----   पोपट.
-----------------------------
(४) लांब चोच.
लांब मान,
पांढरा रंग,
लावतो ध्यान
सांगा पाहू मी कोण ? 

उत्तर : -----   बगळा.
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
     जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
    केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
   ९४२२७३६७७५

1 comment: