निसर्ग हा आदिवासींचा देव आहे. निसर्गातील सर्व घटक आमचे रक्षक आहेत. आदिवासी भागातील नैसर्गिक समृध्दीचा आम्हांला अभिमान आहे.
आदिवासी भागात आम्ही केलेल्या पशुपक्षांचे रक्षण आणि पारंपरिक विधी, निसर्गाचे पूजन हीच आमची थोर परंपरा आहे.
निसर्गाचे संतुलन हा आदिवासींचा प्राण आहे. निसर्गाचा निकोप हीच आमची शान आहे.
आदिवासी संस्कृतीतील आणि निसर्गातील घटक यांच्याशी निष्ठा राखण्याचा व प्रदूषणातील -हास आणि निसर्गातील समृध्दी अक्षय ठेवण्याचा आम्ही सदैव प्रयत्न करणार.
आदिम भूमातेचा गौरव, कल्याण आणि जल, जंगल , जमिन यातच आदिवासींचे हित सामावले आहे.
|| जय निसर्ग माता --जय धरती माता ||
लेखन :- शंकर चौरे सर
काकरपाडा (चोपाळे ) ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment