पुढे दिलेल्या सहज सोप्या गोष्टी जर तुम्ही अंमलात आणल्यात तर पर्यावरण संवर्धन आपोआप साधलं जाईल.
(१ ) पाण्याचा अपव्यय टाळा. पाण्याचा सुयोग्य वापर करा.
(२) कागदाचा अपव्यय टाळा. कागदाच्या दोन्ही बाजूंवर लिहा.
(३) विजेचा वापर नियोजनबद्ध करा.
(४) जास्त तीव्रतेचे ध्वनी निर्माण करू नका.
(५) वाढदिवसानिमित्त किंवा विशेष सण-समारंभाच्या दिवशी वृक्षारोपण करा आणि लावलेल्या झाडांची जोपासना करा.
(६) दैनंदिन जीवनात शक्यतो जैविक विघटनशील वस्तूंचाच वापर करा. अविघटनशील वस्तूंचा वापर टाळा.
(७) आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा.
(८)दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करा.
(९) जैविक विघटनशील वस्तू जाळून नष्ट करू नका.
(१०) पर्यटनस्थळं आणि सहलीची ठिकाणं स्वच्छ राखण्याकडे लक्ष द्या.
(११) सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचाच वापर करा.
(१२) उपयुक्त प्राणी, पक्षी आणि किटकांना मारू नका.
(१३) तुमच्या परिसरामध्ये आढळणाच्या विविध प्रकारच्या परिसंस्थांचा अभ्यास करा.
===============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा -- जामनेपाडा
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
Neha Dileep Waghmode
ReplyDelete