माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 22 April 2022

सामान्यज्ञान प्रश्नावली



(१) आंब्याच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर -- कोय

(२) फणसाच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर -- आठळी

(३) चिंचेच्या बीला काय म्हणतात.
उत्तर -- चिंचोका

( ४) कापसाच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर -- सरकी

(५) अन्नाची चव घेण्यासाठी शरीराचा अवयव वापरला जातो ?
उत्तर -- जीभ

(६)  टीव्ही पाहताना शरीराच्या कोणत्या भागाचा प्रामुख्याने उपयोग होतो ?
उत्तर -- डोळे

(७) सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- छावा

(८) बैलाच्या मादीला काय म्हणतात ?
उत्तर -- गाय

(९) गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- वासरू

(१०) पिकलेल्या केळ्यांचा रंग कोणता ?
उत्तर -- पिवळा

(११) लिंब या फळाची चव कशी असते  ?
उत्तर -- आंबट

(१२) टेलिफोन या शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द कोणता ?
उत्तर --  दूरध्वनी
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment