माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

3280639

Thursday, 21 April 2022

कठं काय ?



पाणीमं मासा
जंगलमं ससा
शाळमं पोसा
हांडीमं रसा

शाळमं पोशी
घरमं डोशी
कपमं बशी
गादीवर उशी

वसरीमं उखळ
हातमं मुसळ
पायमं साकळ
चिखल्यामं कमळ

भोगनीमं डाळ
गळामं माळ
हिरमं  गाळ
बागमं केळं

रानमं वाघ
नाळमं नाग
जगलमं साग
मनमं राग

वावरमं खळा
डालखीमं ईळा
निढाळला टिळा
शाळमं फळा

डबामं पीठ
भाजीमं मीठ
खोलीमं खाट
वावरमं वाट

देव्हारामं दिवा
चुल्हावर तवा
कडाईमं रवा
देऊळमं बोवा
=======================
लिखणार :- शंकर सिताराम चौरे
काकरपाडा (चौपाळे ) ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
=====================
मार्गदर्शक :-
श्री. महारू सिताराम चौरे (पिंपळनेर)

No comments:

Post a Comment