माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 21 April 2022

सामान्यज्ञान प्रश्नावली



(१) विमान चालकाला काय म्हणतात ?
उत्तर -- पायलट

(२) रेल्वे चालकाला काय म्हणतात ?
उत्तर -- मोटरमन

(३) साडीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध शहर कोणते ?
उत्तर -- येवला

(४) चादरीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध शहर कोणते ?
उत्तर -- सोलापूर

(५) शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- करडू

(६) वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- बछडा

(७) रेड्याच्या ओरडण्याला काय म्हणतात ?
उत्तर -- रेकणे

(८) हत्तीच्या ओरडण्याला काय म्हणतात ?
उत्तर -- चित्कारणे

(९) घोड्याच्या घरास काय म्हणतात ?
उत्तर -- तबेला

(१०) सुगरणीच्या घरट्यास काय म्हणतात ?
उत्तर -- खोपा

(११) संत्री फळासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता ?
उत्तर -- नागपूर

(१२) महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?
उत्तर -- मराठी
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment