(१) दोन पाय असलेले प्राणी.
उत्तर -- कावळा, माणूस, बदक, कबूतर.
(२) शिंगे असणारे प्राणी.
उत्तर -- बैल, गाय, म्हैस, शेळी.
(३) काटेरी वनस्पती.
उत्तर -- बोर, बाभूळ, साबर, गुलाब.
(४) दूध देणाऱ्या प्राण्यांची नावे.
उत्तर -- गाय, म्हैस, शेळी, सा़ंडणी.
(५) फळांची नावे.
उत्तर -- पेरू, पपई, संत्री, चिकू.
(६) झाडांची नावे.
उत्तर -- साग, पिंपळ, वड, बांभूळ..
(६) वाहनांची नावे.
उत्तर -- बस, रिक्षा, आगगाडी, विमान.
(७) कीटकांची नावे.
उत्तर -- माशी, मुंगी, डास, झुरळ.
(८) फुलांची नावे.
उत्तर -- गुलाब, कमळ, चाफा, जास्वंद.
(९) पक्ष्यांची नावे.
उत्तर -- मोर, चिमणी, पोपट, बगळा.
(१०) जंगली प्राण्यांची नावे.
उत्तर -- वाघ, सिंह, माकड, कोल्हा.
(११) सरपटणारे प्राणी.
उत्तर -- मगर, गांडूळ, कासव, सरडा
(१२) धान्यांची नावे.
उत्तर -- बाजरी, गहू, नाचणी, मका.
(१३) मसाल्याचे पदार्थ.
उत्तर -- जीरे, हळद, लसूण, मिरची.
(१४) खेळांची नावे.
उत्तर -- कबड्डी, क्रिकेट, लंगडी, फुटबॉल.
(१५) घरातील वस्तूंची नावे.
उत्तर -- बादली, झाडू, आरसा, कंगवा.
(१६) रंगाची नावे.
उत्तर -- लाल, काळा, पिवळा, हिरवा.
(१७) मुख्य दिशांची नावे.
उत्तर -- पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर.
(१८) शेपूट असणारे प्राणी.
उत्तर -- बैल, वाघ, कुत्रा, माकड.
(१९) पाण्यातील प्राणी.
उत्तर -- मासे, बेडूक, खेकडा, मगर.
(२०) पाय नसलेले प्राणी.
उत्तर -- गांडूळ, साप, मासा, अजगर.
(२१) वनस्पतीचे अवयव.
उत्तर -- मूळ, खोड, पान, फूल.
(२२) शेंगा येणा-या वनस्पती.
उत्तर -- गवार, शेवगा, मटार, गुलमोहर.
(२३) एक बी असलेली फळे.
उत्तर -- आवळा, आंबा, बोरे, खजूर.
(२४) अनेक बिया असलेली फळे.
उत्तर -- कलिंगड, सीताफळ, फणस, पेरू.
==========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment