माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 1 July 2022

जोड्या जुळवून वाचूया.(सामान्यज्ञान)



(१) साखर  = गोड
(२) मीठ = खारट
(३) चिंच  = आंबट
(४) कारले = कडू
(५) आवळा = तुरट
================
(१) डोळे  = पाहणे
(२) नाक  = वास घेणे.
(३) कान = ऐकणे
(४)जीभ  = चव घेणे.
(५) पाय  = चालणे
================
(१) ज्वारी  = भाकरी
(२) गहू = चपाती
(३) तांदूळ = भात
(४) डाळ  = वरण
(५) मटकी = उसळ
================
(१) शिक्षक = शाळा
(२) ग्रामसेवक = ग्रामपंचायत
(३) डाॅक्टर  = दवाखाना
(४) पोस्टमन = पोस्ट
(५) पोलिस = पोलिसचौकी
==================
(१) शेतकरी = शेतीकाम
(२) सुतार  = लाकूडकाम
(३) शिंपी = शिवणकाम
(४) लोहार  = लोखंडकाम
(५) गवंडी  = बांधकाम
=================
(१) हळद  = पिवळी
(२) कोळसा = काळा
(३) दूध  = पांढरे
(४) कुंकू  = लाल
(५) जांभूळ  = जांभळे
==================
(१) चिमणी = घरटे
(२) कोंबडी  = खुराडे
(३) उंदीर  = बीळ
(४) सिंह  = गुहा
(५) गाय  = गोठा
==================
(१) गाय  = वासरू
(२) मांजर  = पिल्लू
(३) म्हैस  = रेडकू
(४) मेंढी  = कोकरू
(५) शेळी  =  करडू
===================
(१) केळ्यांचा = घड
(२) लाकडांची = मोळी
(३) फुलांचा = गुच्छ
(४) किल्ल्यांचा = जुडगा
(५) हरणांचा  = कळप
=====================
लेखन :- शंकर चौरे (प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment