माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 4 September 2019

ऐतिहासिक -- सामान्यज्ञान

(१) ताजमहल कोठे आहे  ?
--- आग्रा

(२) अंजनेरी नाणेसंग्रहालय कोणत्या जिल्ह्यात आहे  ?
---  नाशिक

(३) बीबी का मकबरा कोणत्या शहरात आहे  ?
---  औरंगाबाद

(४) शनिवारवाडा कोणी बांधला  ?
---  पेशवा पहिला बाजीराव

(५) भारतात शिलालेखांचा सर्वांत मोठा संग्रह कोठे आहे  ?
---  म्हैसूर

(६)छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे  ?
---  रायगड

(७) मराठी विश्वकोश कार्यालय कोठे आहे  ?
---  सातारा

(८) पाचाड (रायगड ) येथे कोणाची समाधी आहे ?
---  राजमाता जिजाबाई

(९)अंजिठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे  ?
---  औरंगाबाद

(१०) भारतात पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली  ?
---  मुंबई
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
             ९४२२७३६७७५

Tuesday, 3 September 2019

वैज्ञानिक प्रश्नावली  - कारणे सांगा पाहू  !

(१) समुद्राचे पाणी खारट का असते  ?

-- समुद्रात विरघळलेल्या अनेक क्षारांमुळे समुद्राचे
     पाणी खारट असते  ?
--------------------------------------------------

(२) पावसाळ्यात हवा दमट का असते  ?

-- पावसाळ्यात हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण जास्त असते, म्हणून पावसाळ्यात हवा दमट असते.
--------------------------------------------------

(३) हवेचे प्रदूषण वाढले आहे  ?

-- कारखाने आणि वाहने यांच्यामुळे हवेचे प्रदूषण
होते. अलीकडील काळात कारखाने आणि वाहने यांची अमर्याद वाढ झाली आहे. म्हणून हवेचे प्रदूषण वाढले आहे.
--------------------------------------------------

(४)भू - जल पातळी फार खोल जाऊ लागली आहे ?

---  1. जमिनीवरून  वाहणारे पाणी जमिनीत मुरते.
 या पाण्याला भू - जल म्हणतात. 2. भू - जल आपण विहिरी आणि कूपनलिका खोदून वापरतो. माणसे हे भू - जल सतत वापरत आहेत. म्हणून भू  - जल पातळी फार खोल जाऊ लागली आहे.
--------------------------------------------------

(५) पाण्याला  ' जीवन ' असे म्हणतात  ?

--- 1. आपण दररोज सकाळी उठल्यापासून
पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, अन्न शिकवण्यासाठी,
कपडे धुण्यासाठी पाणी वापरत असतो. 2. या कामासाठी पाण्याऐवजी दुसर्‍या कोणत्याही पदार्थाचा वापर करता येत नाही;  म्हणून पाण्याला  'जीवन ' असे म्हणतात.
===============================
संकलन :-  शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
             ¤ ९४२२७३६७७५ ¤

Monday, 2 September 2019

शिवराय -- ऐतिहासिक प्रश्नावली

(१) छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते  ?
---  शहाजीराजे भोसले

(२) छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते  ?
---  जिजाबाई

(३) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते  ?
---  सईबाई

(४)छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय होते  ?
---  संभाजी भोसले

(५) संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते ?
---  येसूबाई

(६) हिंदवी स्वराज्याची स्थापना कोणी केली  ?
---   छत्रपती शिवाजी महाराज

(७) छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते  ?
---   मालोजीराजे भोसले

(८) छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजीचे नाव काय होते  ?
---   उमाबाई

(९) जिजाबाई ही सिंदखेडच्या कोणाची मुलगी होती  ?
---  लखुजीराव जाधव

(१०)शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला  ?
---   शिवनेरी  (पुणे )

(११) शिवरायांचा जन्म कोणत्या तारखेला झाला  ?
---    १९ फेब्रुवारी १६३०

(१२) सईबाई कोणाची मुलगी होती  ?
---   नाईक निंबाळकर

==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक )
         पिंपळनेर,  ता. साक्री जि. धुळे
         ९४२२७३६७७५