माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 2 September 2019

शिवराय -- ऐतिहासिक प्रश्नावली

(१) छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते  ?
---  शहाजीराजे भोसले

(२) छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते  ?
---  जिजाबाई

(३) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते  ?
---  सईबाई

(४)छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय होते  ?
---  संभाजी भोसले

(५) संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते ?
---  येसूबाई

(६) हिंदवी स्वराज्याची स्थापना कोणी केली  ?
---   छत्रपती शिवाजी महाराज

(७) छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते  ?
---   मालोजीराजे भोसले

(८) छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजीचे नाव काय होते  ?
---   उमाबाई

(९) जिजाबाई ही सिंदखेडच्या कोणाची मुलगी होती  ?
---  लखुजीराव जाधव

(१०)शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला  ?
---   शिवनेरी  (पुणे )

(११) शिवरायांचा जन्म कोणत्या तारखेला झाला  ?
---    १९ फेब्रुवारी १६३०

(१२) सईबाई कोणाची मुलगी होती  ?
---   नाईक निंबाळकर

==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक )
         पिंपळनेर,  ता. साक्री जि. धुळे
         ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment