(१) समुद्राचे पाणी खारट का असते ?
-- समुद्रात विरघळलेल्या अनेक क्षारांमुळे समुद्राचे
पाणी खारट असते ?
--------------------------------------------------
(२) पावसाळ्यात हवा दमट का असते ?
-- पावसाळ्यात हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण जास्त असते, म्हणून पावसाळ्यात हवा दमट असते.
--------------------------------------------------
(३) हवेचे प्रदूषण वाढले आहे ?
-- कारखाने आणि वाहने यांच्यामुळे हवेचे प्रदूषण
होते. अलीकडील काळात कारखाने आणि वाहने यांची अमर्याद वाढ झाली आहे. म्हणून हवेचे प्रदूषण वाढले आहे.
--------------------------------------------------
(४)भू - जल पातळी फार खोल जाऊ लागली आहे ?
--- 1. जमिनीवरून वाहणारे पाणी जमिनीत मुरते.
या पाण्याला भू - जल म्हणतात. 2. भू - जल आपण विहिरी आणि कूपनलिका खोदून वापरतो. माणसे हे भू - जल सतत वापरत आहेत. म्हणून भू - जल पातळी फार खोल जाऊ लागली आहे.
--------------------------------------------------
(५) पाण्याला ' जीवन ' असे म्हणतात ?
--- 1. आपण दररोज सकाळी उठल्यापासून
पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, अन्न शिकवण्यासाठी,
कपडे धुण्यासाठी पाणी वापरत असतो. 2. या कामासाठी पाण्याऐवजी दुसर्या कोणत्याही पदार्थाचा वापर करता येत नाही; म्हणून पाण्याला 'जीवन ' असे म्हणतात.
===============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
¤ ९४२२७३६७७५ ¤
No comments:
Post a Comment