माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 8 October 2019

रक्तदान महत्वपूर्ण माहिती

(१) रक्तदान म्हणजे काय  ?
-- निरोगी व्यक्तीने रुग्णांच्या उपयोगासाठी
   रक्त देण्याच्या क्रियेला रक्तदान म्हणतात.
  

(२) रक्त घेणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात  ?
--- ग्राही

(३) रक्त देणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात  ?
--  दाता

(४) रक्ताचे गट किती  ?
--   चार

(५) रक्ताचे गट कोणते  ?
--   A,   B,   AB,   O

(६) रक्त दाता असे कोणत्या गटास म्हणतात  ?
---  O

(७) O गट असलेल्या व्यक्तीस कोणत्या गटाचे
      रक्त चालते  ?
---  O

(८) सर्व गटात चालणारे रक्त कोणते  ?
---  O

(९) A गट असलेल्या व्यक्तीस कोणत्या रक्ताचे
     गट चालते  ?
---  A ,   O

(१०) B गट असलेल्या व्यक्तीस कोणत्या गटाचे
     रक्त चालते  ?
---  B ,  O

(११) A गट असलेल्या व्यक्ती कोणत्या गटाच्या
       व्यक्तीस रक्त देऊ शकतो  ?
---   A,   AB

(१२) B  गट असलेल्या व्यक्ती कोणत्या गटाच्या
       व्यक्तीस रक्त देऊ शकतात  ?
---  B,   AB

(१३) AB  गट असलेल्या व्यक्ती कोणत्या
        रक्तगटांच्या व्यक्तीस रक्त देऊ शकतात ?
---  AB

(१४) रक्तदान दिल्यानंतर शरीर किती तासात
        रक्त  भरून काढते  ?
---   चोवीस तास

(१५) रक्तदान करतांना किती मिली रक्त
       शरीरातून काढले जाते  ?
---  ३००  -- ३५० मिलीग्रॅम

(१६)रक्तपेढ्यात जमा केलेले रक्त कोठे साठवतात ?
---  रेफ्रिजरेटरमध्ये

(१७) 'O' या रक्तगटाला  'सार्वत्रिक दाता ' म्हणतात ?

---  'O'  या रक्तगटाचे रक्त सर्व रक्तगटांच्या
      रूग्णांना देता येते. म्हणून  'O'  रक्तगटाला
     ' सार्वत्रिक दाता ' म्हणतात.

(१८)  'AB ' रक्तगटाला सर्वग्राही म्हणतात  ?

---  'AB ' रक्तगटाची व्यक्ती कोणत्याही रक्तगटाच्या
    व्यक्तीकडून  रक्त घेऊ शकते, म्हणून  'AB'
     रक्तगटाला  सर्वग्राही म्हणतात.
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक )
             पिंपळनेर  ता. साक्री  जि. धुळे
            ९४२२७३६७७५

Friday, 4 October 2019

भौगोलिक प्रश्नावली ( म्हणजे काय  ?  )

( १) निर्यात म्हणजे काय  ?
--- देशाबाहेर माल पाठवला जातो, त्यास 'निर्यात '
     म्हणतात  ?
-----------------------------------------------------

(२) आयात म्हणजे काय  ?
---  इतर देशांकडून आपण माल आणतो, त्यास
     'आयात ' म्हणतात.
-----------------------------------------------------

(३) खासगी मालमत्ता म्हणजे काय  ?
--- स्वतःच्या मालकीच्या वस्तूंना  'खासगी '
     मालमत्ता म्हणतात.
-----------------------------------------------------

(४) व्यापार म्हणजे काय  ?
--- ज्या वस्तू आपल्याकडे जास्त असतात, अशा
    वस्तू आपण इतरांना विकतो आणि ज्या वस्तूंची
   आवश्यकता असते, त्या वस्तू इतरांकडून विकत
    घेतो. अशा प्रकारच्या वस्तूंच्या देवाणघेवाणीस
   'व्यापार ' म्हणतात.
-----------------------------------------------------

(५) उद्योग म्हणजे काय  ?
---  कच्च्या मालाचे उपयोगी पक्क्या मालात
     रूपांतर करणे यास उद्योग म्हणतात.
-----------------------------------------------------

(६)छोटे उद्योग म्हणजे काय  ?
---  ज्या उद्योगांत थोडेच लोक लहानशा जागेत
    हातांनी किंवा लहान लहान यंत्रांनी उपयोगी
    वस्तू बनवतात, त्यांना छोटे उद्योग म्हणतात.
-----------------------------------------------------

(७) मोठे उद्योग म्हणजे काय  ?
---जेथे मोठमोठ्या यंत्रांच्या मदतीने पुष्कळ माणसे   
   काम करून मोठ्या प्रमाणावर वस्तू तयार
   करतात, त्यांना मोठे उद्योग म्हणतात.
-----------------------------------------------------

(८) कारखाना म्हणजे काय  ?
--- जेथे अनेक उपयोगी वस्तू हातांनी व यंत्रांनी
    तयार करतात, त्यास कारखाना म्हणतात.
-----------------------------------------------------

(९) उद्योगधंदे म्हणजे काय  ?
--- कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून
   नवीन वस्तू तयार करतात,  त्यास  'उद्योगधंदे '
   म्हणतात.
-----------------------------------------------------

(१०) वाहतूक म्हणजे काय  ?
--- माल किंवा माणसे एका ठिकाणाहून दुसर्‍या
    ठिकाणी नेणे याला वाहतूक म्हणतात.

=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर  ता. साक्री  जि. धुळे
             ९४२२७३६७७५

Monday, 30 September 2019

वारली चित्रकलेविषयी थोडक्यात माहिती

    वारली चित्र हे चित्रपरंपरेतील चित्र आहे. वारली
चित्रकलाशैलीचा उदय ठाणे / पालघर जिल्हयात
वारली आदिवासी जमातीत झाला.
 
● वारली चित्राविषयी विशेष माहिती --
 
 (१) निसर्गाचे चित्रण :--
  वारली चित्रकलेत काही वनस्पतींच्या फांद्या,
 फुलझाडे,  उगवता सूर्य,  पक्षी यांची चित्रे रेखाटलेलीदिसतात.

(२) मानवीकृतीचे रेखाटन :-
       वारली चित्रकलेत स्त्री - पुरूष नृत्य करतांना,
खेळणारी मुले यांची चित्रे रेखाटलेली दिसतात.
वारली चित्रात माणसांची हुबेहुब चित्रे नसतात. ती फक्त रेखाचित्रे असतात. त्रिकोण, चौकोन व वर्तुळ
यांच्या साहाय्याने मानवाकृती रेखाटल्या जातात.

(३) व्यवसाय  :-
        वारली चित्रात शेती करणारे स्त्री - पुरूष दिसतात.  पशुपालन हाही या लोकांचा व्यवसाय
असावा.

(४) घरे  :-
       वारली चित्रकलेत उतरत्या छपरांच्या झोपड्या
चित्रात दिसतात. झोपड्यांच्या भिंती कुडाच्या किंवा
मातीच्या असतात . त्यावर चित्रे काढलेली असतात.
      वारली चित्रातून वारली समाजजीवन व्यक्त होते.
हे लोक गरीब आहेत,  हे जाणवते. हे लोक जसे
जगतात, त्याच परिसरातील व अनुभवातील मानवी
व निसर्ग घटकांचे आकार ते रेखाटताना दिसतात.

ईऔत==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक )
              पिंपळनेर ता. साक्री  जि. धुळे
               ९४२२७३६७७५