वारली चित्र हे चित्रपरंपरेतील चित्र आहे. वारली
चित्रकलाशैलीचा उदय ठाणे / पालघर जिल्हयात
वारली आदिवासी जमातीत झाला.
● वारली चित्राविषयी विशेष माहिती --
(१) निसर्गाचे चित्रण :--
वारली चित्रकलेत काही वनस्पतींच्या फांद्या,
फुलझाडे, उगवता सूर्य, पक्षी यांची चित्रे रेखाटलेलीदिसतात.
(२) मानवीकृतीचे रेखाटन :-
वारली चित्रकलेत स्त्री - पुरूष नृत्य करतांना,
खेळणारी मुले यांची चित्रे रेखाटलेली दिसतात.
वारली चित्रात माणसांची हुबेहुब चित्रे नसतात. ती फक्त रेखाचित्रे असतात. त्रिकोण, चौकोन व वर्तुळ
यांच्या साहाय्याने मानवाकृती रेखाटल्या जातात.
(३) व्यवसाय :-
वारली चित्रात शेती करणारे स्त्री - पुरूष दिसतात. पशुपालन हाही या लोकांचा व्यवसाय
असावा.
(४) घरे :-
वारली चित्रकलेत उतरत्या छपरांच्या झोपड्या
चित्रात दिसतात. झोपड्यांच्या भिंती कुडाच्या किंवा
मातीच्या असतात . त्यावर चित्रे काढलेली असतात.
वारली चित्रातून वारली समाजजीवन व्यक्त होते.
हे लोक गरीब आहेत, हे जाणवते. हे लोक जसे
जगतात, त्याच परिसरातील व अनुभवातील मानवी
व निसर्ग घटकांचे आकार ते रेखाटताना दिसतात.
ईऔत==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment