माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 30 June 2017

उच्चारातील फरक ओळखूया


                     उपक्रम
         उच्चारातील फरक ओळखूया
    
कृती -१.उच्चारभेद असलेल्या शब्द जोड्यांच्या
          पट्ट्या गटानुसार वाचून घ्याव्यात.
          उदा.  ताट -थाट
        २.शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या उच्चारांचे
         काळजीपूर्वक श्रवण करावे.उच्चार
         चुकल्यास वेळीच दुरूस्त करून शब्द
         पुन्हा म्हणून घ्यावेत.
        ३.पुढे दिलेल्या शब्द जोड्यांचा सराव
         घ्यावा.
१.क- ख   
   कण -खण      कप - खप
   कडा - खडा    कडी -खडी
   कळी -खळी    कडक -खडक
   कार -खार        काठ - खाट
   काऊ -खाऊ     कुळ -खूळ
   केळ - खेळ.   
--------------------------------------------
२.ग- घ
   गर - घर           गण - घण
   गड - घड         गडी  - घडी
   गार - घार         गाव -घाव    
   गाठ  - घाट
___________________________
३. च -छ
चल - छळ       चमचम - छमछम
चाप - छाप      चावा   - छावा
___________________________
४. ज -झ 
   जळ - झळ       जरा -झरा
   जगा - झगा      जाड - झाड.
____________________________
५. ट- ठ 
   टक  - ठक         टीक - ठीक .
   टोक - ठोक     
____________________________
६.ड- ढ  
   डोल - ढोल         कड - खड
   कडी - खडी  
---------------s. s. chaure----------
७.त- थ 
    तवा - थवा         ताट - थाट.
    ताप -थाप          तारा  - थारा
    संत - संथ          पंत   - पंथ
__________________________
८.द- ध 
    दर  - धर            दार  - धार
    दीर - धीर           दूर  - धूर
___________________________
९. प- फ 
   पळ  - फळ         पळा  - फळा
   माप  - माफ        साप  - साफ
   पार   - फार         पूल   - फूल.
____________________________
१०.ब- भ  
बट - भट           बडबड - भडभड
बाग - भाग        बारा   - भारा
बाई  - भाई       बाजी - भाजी
____________________________
११.ल- ळ 
  नल  - नळ         बल  - बळ
  काल - काळ       माल - माळ
  वेल  - वेळ          गाल  - गाळ
___________________________
१२.ण - न 
   सण - सन           कोण - कोन
   मण - मन
__________________________
१३.श - स  
   शाप - छाप        वेश - वेस
   माशा- मासा     
____________________________
  १४.   ष  - स    
   घोष - घोस         कोष - कोस 
___________________________
     श - ष    
   देश --वेष          वैशाख - पोषाख.
___________________________

   संकलक :-  शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
                    धुळे ९४२२७३६७७५ 

http://shankarchaure.blogspot.in

Wednesday, 28 June 2017

पाणी जाणीव जागृती - घोषवाक्य

    पाणी जाणीव जागृती - घोषवाक्य

   पाण्याविषयी माहिती देण्यासाठी किंवा
पाणीबचत व वापर यांविषयी जाणीव
जागृती करण्यासाठी घोषवाक्य यांचा चांगला
वापर करता येतो. पाणीविषयक घोषवाक्य
तयार करून विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी.
पाणीविषयक घोषवाक्य तयार करण्याच्या
स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी ठेवाव्या. त्यामुळे अनेक
प्रकारची घोषवाक्य आपल्याला मिळतील.
त्याचे पाठांतर करून घ्यावे. उदाहरणादाखल
काही घोषवाक्य दिली आहेत.

       घोषवाक्य :-
(१) स्वच्छ पाणी, सुंदर परिसर,
     जीवन होईल, निरोगी निरंतर.

(२) पिण्यासाठी हवे स्वच्छ पाणी
      नाहीतर होईल आरोग्य हानी.

(३)  पाणी शुद्धीकरण नियमित करू
      सर्वांचे जीवन आरोग्यसंपन्न करू.

(४)  पाण्याच्या स्वच्छतेविषयी दक्षता घेऊ
      सर्व रोगराईंना दूर पळवू.

(५)  सांडपाण्याची योग्य विल्हेवाट
      गावात येईल आरोग्याची पहाट.

(६) पिण्यासाठी हो स्वच्छ पाणी
      एकच मंत्र ठेवा ध्यानी.

(७) पाण्याची राखा शुद्धता
     जीवनाला मिळेल आरोग्यता.

(८) पाण्याचे पुनर्भरण, जीवनाचे संवर्धन.
    
(९) प्रत्येकाचा एकच नारा
      पाण्याची काटकसर करा.

(१०) थेंब थेंब वाचवू पाणी,
       आनंद येईल जीवनी.

संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
               जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
               ता.साक्री जि.धुळे
              📞 ९४२२७३६७७५

Tuesday, 27 June 2017

फक्त नावे सांगा


                   उपक्रम
            फक्त नावे सांगा

  संकलक :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे
                  ¤ ९४२२७३६७७५ ¤

(१)परांची हालचाल करून पाण्यात
     पोहणारे प्राणी  -- मासे.

(२)जमिनीवर चालणारे आणि हवेत
     उडणारे प्राणी  -- पक्षी, झुरळ.

(३)पायांशिवाय सरपटत जाणारे प्राणी.
     --  साप, गांडूळ.

(४)लहान पायांनी सरपटत चालणारे
    प्राणी  --- सरडा, पाल, कासव.

(५)चार पायांनी टुणटुण उड्या मारत
    चालणारे प्राणी.  -- ससा, बेडूक.

(६) चार पायांनी जमिनीवर चालणारे
    अथवा धावणारे प्राणी -- कुत्रा,  बैल.

(७)आकाराने सर्वांत मोठा पक्षी -- शहामृग.

(८)वेगाने धावणारा पक्षी -- शहामृग.
--- s.  s. chaure ----------------------------

(९)शिंगे असणारे प्राणी -- हरिण, गाय,गेंडा.

(१०)आठ पायांचा किडा  --  कोळी.

(११)मातीचे कण रचून वारूळ बनवणारे
        प्राणी  -- मुंग्या.

(१२)घरटी न बांधणारे पक्षी  -- कोकिळ,
        कोंबडी.

(१३)अन्न जिभेने पकडणारा आणि न
       चावता गिळणारा प्राणी -- सरडा.

(१४)लोकर मुख्यतः या प्राण्यांच्या अंगावरील
      केसांपासून बनवली जाते.  -- मेंढी.

(१५) रवंथ करणारे प्राणी  -- गाय,  म्हैस.

  संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                 जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                  ता.साक्री जि.धुळे
                 📞 ९४२२७३६७७५

Saturday, 10 June 2017

उपक्रम -: वर्गसफाई व सजावट


      उपक्रम -: वर्गसफाई व सजावट

(१) उद्देश  :-
 ----  स्वच्छता,साफसफाई व्यवस्थितपणा,
  स्वावलंबन, सौंदर्यदृष्टी इ. गुणांची जोपासना
  करण्यासाठी विद्यार्थ्यांना इष्ट अशा सवयी
  लावणे. कोवळ्या वयाची मुले ज्या ठिकाणी
  दिवसातले सहा तास घालवतात त्या ठिकाणी
  अध्ययन, अध्यापनाला पोषक असे प्रसन्न
वातावरण निर्माण करणे.

(२) सहभागी घटक :-
---- वर्गशिक्षक, वर्ग मंत्रिमंडळ, वर्गातील इतर
   विद्यार्थी.

(३) कार्यपद्धती :-
   १. वर्गातील मुलांचे सोयीस्कर असे चार -पाच
    गट पाडण्यात येतील. प्रत्येक गट आपला
    गटप्रमुख निवडतील.
   २. प्रत्येक गटाला काम नेमून देण्यात येईल.
   ३. गटाच्या वाट्याला आलेले काम गडबड,
       गोंधळ, बडबड न करता उत्तम रीतीने पूर्ण
       करील.
   ४. वर्गशिक्षक, सर्व कामावर देखरेख करतील.
        मार्गदर्शन करतील. काही उपक्रमात     
        सहभागी होतील.
  
● कामाचे नियोजन :--
  १. सर्व विद्यार्थ्यांना काम मिळेल अशी
     व्यवस्था करणे.
  २ कोणत्या क्रमाने कामे करावयाची त्याचा
    क्रम निश्चित करणे. उदा. वर्गातील सर्व
   साहित्य जागच्या जागी ठेवणे,झाडून घेणे,
  उडालेला धुरळा झटकणे, रांगोळी काढणे इ.
  ३.लागणारे साहित्य आधी तयार ठेवणे.
  ४.करावयाच्या कामासंबंधी सूचना देणे.
    काम करावयाचे वेळी कोणती दक्षता
    घ्यावयाची यासंबंधी सूचना देणे.

■ साहित्य :-
  १. झाडू, टेबल, खुर्ची, फळा इ.साहित्यावरील
     धूळ झटकण्यासाठी कापड, पांढरे व रंगीत
     खडू, फुले, पाने, रांगोळी, पाणी इ.
 २ साप्ताहिक कामासाठी एक बादली, पाणी,
   बांबूला बांधलेली केरसुणी इ.

■ करावयाचा कामाचा तपशिल :--
  (A) दैनंदिन काम :-
  १ प्रत्येक गटाने कोणती कामे करावयाची
    याच्या सूचना वर्गशिक्षक देतील.
२.टेबल, खुर्ची,पेटी,कपाट,फळा,वर्गातील फोटो,
  चित्रे, तक्ते इ. साहित्य जागच्या जागी ठेवले
  जाईल. वेडेवाकडे झाले असल्यास ते व्यवस्थित
  केले जाईल. खिडक्यांचे दरवाजे नीट उघडले
  जातील.
३.हलक्या हाताने जमिनीवर पाणी शिंपडले
  जाईल. त्यामुळे जमिनीवरील धुरळ उडणार
  नाही. मुलांच्या नाकातोंडात जाणार नाही.
  वर्गाची खोली केरसुणीने झाडली जाईल.
  कानाकोपऱ्यात तसेच पेटी,कपाटामागील
  केरकचरा झाडून घेतला जाईल. केरकचरा
  एके ठिकाणी गोळा करून कचरा टाकण्यासाठी
  केलेल्या खास खड्ड्यात टाकला जाईल.
  इतर ठिकाणी टाकला जाणार नाही. एका
  साध्या फडक्याने टेबल,खुर्ची, कपाट, फळा,
  दरवाजे इत्यादी साहित्यावरील धुरळ झटकून
  घेतला जाईल.
४.वर्गातील फळा ओल्या फडक्याने स्वच्छ
  पुसला जाईल. त्यावर उजव्या वरच्या
  कोपर्‍यात वार, दिनांक, पटसंख्या,उपस्थिती
  इ. तपशील पांढर्‍या खडूने चांगल्या अक्षरात
  लिहिला जाईल.फळ्याच्या मध्यभागी वरच्या
  बाजूला सुविचार लिहिले जाईल.
 ५. काही गटाची कामे चालू असतांनाच एक
   गट पाने,फूले गोळा करून आणील.
   त्यांचे एक तोरण तयार करून दरवाजाच्या
   चौकटीला लावतील. दुसरा गट रांगोळी
   काढील. हात -पाय धुऊन आणि सजावट
   आवरून,केर काढण्याचा झाडू दृष्टीस
   पडणार नाही; असा कोपर्‍यात ठेवला जाईल.
   विद्यार्थी सामुदायिक प्रार्थनेसाठी वर्गाची
   रांग करून रांगेने जातील. ते प्रार्थनेसाठी
   नेमून दिलेल्या जागेवर जाऊन बसतील.

(B) साप्ताहिक काम :--
   शनिवार किंवा बाजाराच्या दिवशी बहुतेक
  शाळा अर्धा दिवस भरतात .अशा दिवशी
  वरील प्रमाणे सफाईची कामे करून
  घेतले जातील.
  
(C) मासिक काम :-
  महिनाच्या शेवटच्या शनिवारी वरीलप्रमाणे
 सफाईचा कार्यक्रम आखला जाईल.

■ कालमर्यादा :-
  (अ) दैनंदिन कामासाठी १० मिनिटे.
  (ब) साप्ताहिक कामासाठी १ तास.
  (क) मासिक कामासाठी २ तास.

■ अपेक्षित परिणाम :-
 १.शालेय परिसर रोजच स्वच्छ व प्रसन्न राहिल.
 २ प्रत्येक वर्गाची खोली स्वच्छ,सुंदर व
   सुशोभित राहिल.
३.शैक्षणिक साहित्याची नीट जपणूक होईल
  व त्यांचा अध्यापनात वापर होत राईल.
४.वर्गातील भिंती सुस्थितीत राहतील.
५.विद्यार्थ्यांना स्वच्छतेची सवय लागेल.

   संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
                   9422736775 (धुळे)
               

Thursday, 8 June 2017

सर्व शिक्षण मोहिमेची उद्दिष्टे


         सर्व शिक्षण मोहिमेची उद्दिष्टे

■ सर्व शिक्षण मोहिमेमध्ये पुढील उपक्रमांचा/
   घटकांचा समावेश होतो.

(१)शिक्षकांची नियुक्ती.

(२)शाळा/पर्यायी शाळांची सुविधा.

(३)वरिष्ठ प्राथमिक शाळा.

(४)वर्गखोल्या बांधकाम.

(५)मोफत पाठ्यपुस्तके.

(६)शाळा इमारतींची देखभाल व दुरूस्ती.

(७)वरिष्ठ प्राथमिक शाळांना अध्ययन व
  अध्यापन साहित्य पुरविणे.

(८)शाळा अनुदान.

(९)शिक्षक अनुदान.

(१०)शिक्षक प्रशिक्षण.

(११)राज्य शैक्षणिक व्यवस्थापन,प्रशासन
     आणि प्रशिक्षण संस्थेची स्थापना.

(१२)अपंग मुलांच्या शिक्षणाची सोय.

(१३)संशोधन,मूल्यमापन,पर्यवेक्षण आणि
      सुनियंत्रण.

(१४)व्यवस्थापन खर्च.

(१५)मुलींच्या शिक्षणासाठी नवोपक्रम,
    बालशिक्षण,संगोपन आणि अनुसूचित
   जाती -जमाती समुदायातील मुलांसाठी
   विशेष उपक्रम.

(१६)उच्च प्राथमिक वर्गातील मुलांना
      संगणक प्रशिक्षण.

(१७)तालुका साधन केंद्र /गट साधन केंद्र.

(१८)शाळाबाह्य मुलांचे शिक्षण.

(१९) शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे.

(२०)शाळेतील विद्यार्थ्यांची १००%उपस्थिती
      वाढविणे.

(२१)शाळांना शैक्षणिक साहित्य पुरविणे.

(२२)प्राथमिक शिक्षणाच्या गुणात्मक
      वाढीसाठी प्रयत्न करणे.

   संकलक :- शंकर चौरे (प्रा.शिक्षक)
                  जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
                  ता.साक्री जि.धुळे
                  📞 ९४२२७३६७७५

उपक्रम :- वनस्पतींचे संवर्धन


     उपक्रम :- वनस्पतींचे संवर्धन

■ भारतीय संस्कृतीतील सण -समारंभ
   आणि वनस्पतींचे संवर्धन :-

● आपल्या परिसरातील अनेक भागात
   वृक्षांची सणासुदीला पूजा केली जाते.
   या परंपरागत श्रद्धेपोटी निसर्गाचे संवर्धन
   होण्यास मदत होते. सणाची व त्या दिवशी
   महत्त्व असणाऱ्या वृक्षांची माहिती जमा करा.

  ■संदर्भासाठी :--

  *सण*                       *झाडे*

(१)वटपौर्णिमा        -- वड

(२)दसरा               -- आपट्याची पाने .

(३)शुभप्रसंगी         -- आंब्याचे टहाळे.

(४)गुढीपाडवा      -- कडूलिंबाची पाने, झेंडू,
                             आंब्याची पाने.

(५)तुळशी विवाह    --   तुळस.

(६)नवरात्र              --   झेंडू.

(७)नारळी पौर्णिमा    --  नारळ.

    संकलन  :- शंकर चौरे (प्रा.शिक्षक )
                    जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                    ता.साक्री जि. धुळे
                    📞 ९४२२७३६७७५

Sunday, 4 June 2017

नवे प्रयोग - ज्ञानरचनावाद पध्दती


      नवे प्रयोग - ज्ञानरचनावाद पध्दती

           विद्यार्थीच झाले शिक्षक

   विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्याकडून
अध्यापन करून घेण्याचा 'ज्ञानरचनावाद
अध्यापन पध्दत ' हा प्रकल्प आहे. ज्ञानासाठी विद्यार्थ्यांनाी केवळ पाठ्यपुस्तके आणि
शिक्षक त्यांच्यावर अवलंबून राहू नये. तर
आपण  स्वतः ज्ञाननिर्मिती करू शकतो,
हा विश्वास त्यांच्यात निर्माण करण्यासाठी
' राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळा ' तर्फे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
   विद्यार्थ्याने स्वत: प्रयोग करणे, मुक्त प्रश्न
विचारणे, विश्लेषण करणे,समन्वयाने शिकणे
आणि दबावमुक्त शिक्षणातून स्वतःची प्रगती
करणे, असा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल, त्या वेळी
विद्यार्थी शिक्षकांची मदत घेतात. ' मी सांगेन
तेच आणि तेवढेच ज्ञान ' ही सध्याची
एकाधिकारशाही अध्यापन पध्दत बदलण्यासाठी
पर्याय म्हणून राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ात
' ज्ञानरचनावाद ' पध्दतीचा पुरस्कार करण्यात
आला आहे.

   संकलन :-  शंकर चौरे (प्रा.शिक्षक)
                जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                ता.साक्री जि.धुळे
                📞 ९४२२७३६७७५

मातृभाषेतून शिक्षणाचे फायदे

     मातृभाषेतून शिक्षणाचे फायदे

शाळेतील माध्यम, घरातील माध्यम,परिसराचे
माध्यम हे एकच असेल;तर मुलाचे शिक्षण
सहज -सोपे,आकलन नीट होणारे आणि
आनंददायी होते.
  विचार,वृत्ती,भावना,कल्पना यांच्या आड
येणाऱ्या अवरोधांना दूर करण्याची शक्ती
मातृभाषेच्या आधाराने मिळते.

(१)अभिव्यक्तीची रंध्रे मोकळी करण्याचे
   काम मातृभाषा करते.

(२)कुठलेही मूल नव्या संकल्पना शिकताना
  आपल्या सरावाच्या भाषेत त्या सहजासहजी
  आत्मसात करते.

(३)मातृभाषेतून शिकल्याने मुलांच्या जाणिवा
  समृद्ध होतात,आकलनशक्ती विकसित होते.

(४)एखाद्या विषयाकडे बघण्याचा समज
    वृध्दिंगत होते.

(५)आपल्या मातृभाषेमध्ये आपले विचार व
    भावना व्यक्त करणे, हे मुलांसाठी जास्त
    नैसर्गिक व सहज असते.

(६)मातृभाषेतून शिकल्याने मुलांमधील उपजत
   गुणांची चांगली जोपासना होते.

(७)बोलण्याची/विचार करण्याची आणि
    शिक्षणाची भाषा एकच असल्याने शिक्षण
   आनंददायी होते.

(८)घरात ज्या भाषेत संवाद होतात,तीच भाषा,
   तेच वातावरण शाळेत मिळाले; तर मुलांना
   शाळा आपली वाटते,परकेपणा वाटत नाही.
   शाळा हे मजेचे स्थान आहे,असे मुलांना वाटते.

(९)मातृभाषेत शिकले तर अनेक गोष्टी -छंद,
  खेळ करायला संधी आणि वेळ मिळतो.

(१०)मातृभाषेतून शिकल्याने मुले आपापला
    अभ्यास करायला लवकर शिकतात.

(११)मातृभाषेतील शिक्षणामुळे विषयातील
     वेगवेगळ्या संकल्पना सहज कळतात.

(१२)व्यक्तीला विचार करण्याची शक्ती
      मातृभाषा देते.

   संकलन :- शंकर चौरे (प्रा.शिक्षक)
                जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                ता.साक्री जि.धुळे
                📞९४२२७३६७७५

पर्यावरण उपक्रम

               पर्यावरण उपक्रम

         "पालापाचोळा कचरा नव्हे "

  संकलन :- *शंकर चौरे*(पिंपळनेर)धुळे
               
  घराभोवती बाग असेल, तर त्या झाडांचा
पालापाचोळा जमिनीवर गळणारच.
वाळक्या फांद्या कधी वा-या वादळानं तुटून
खाली पडणारच. बरेचसे बागवान हा सगळा
'कचरा कुंपणाबाहेर फेकून देतात. मुळात
ह्याची काही आवश्यकता नाही. पालापाचोळा
हा कचरा नाहीच. ते झाडांचं अन्न आहे !
झाडांना ते परत द्या. स्वच्छतेची फारच हौस
असेल, तर झाडून गोळा केलेला पालापाचोळा
एका कुजखड्डयात साठवा. पावसाळ्यात
त्याचं छान खत होईल. किंवा झाडांच्या
बुंध्यापाशी पाचळण(मलचिंग)करा. तिथेच
त्याचं छान खत होईल. जमीन झाकलेली
राहिल्याने पाण्याची वाफ कमी होईल- ते
वाचेल. ह्यातून सार्वजनिक स्वच्छता -
व्यवस्थेवरचा भार कमी होईल. हाही आणखी
एक लाभ.

  संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
               जि.प.शाळा बांडीकुहेर
               ता.साक्री जि.धुळे
               📞 ९४२२७३६७७५

मानवी संरक्षक : झाडे


            मानवी संरक्षक  : झाडे

  आज प्रदूषणाचा त्रास सर्व जगाला होत
आहे. आज हवेत प्रदूषण आहे. पाण्यात
आहे,औषधातही प्रदूषण आहे. जगभर
त्यावर चर्चा होते. परिसंवाद होतात. पण
ही समस्या कमी होण्याऐवजी वाढतेच आहे.
   हवेतील प्रदूषण मानवनिर्मित आहे.
त्यापैकी कर्बद्विवायू हाही मानवनिर्मित
कारखाने, इंधनाचे ज्वलन, वाहने यामुळे
होतो. यामुळे हवेचे संतुलन बिघडते,
निरनिराळे रोग होतात.
प्रदूषणावर नियंत्रण करण्यास वृक्षलागवड
हा एक उपाय आहे. वने,उपवने निर्माण
करणे आवश्यक आहे.

  ● *झाडामुळे हवा शुध्द होते* :-
--- वातावरण शुध्द हवे असे प्रत्येकालाच
वाटते. त्यात प्राणवायू जास्त असणे जरुरी
आहे. हा प्राणवायू झाडे सोडतात. त्यामुळे
झाडे जास्त तर प्राणवायू जास्त. प्राणवायू
जास्त तर रोगराई कमी  हे गणित दिसते.

● *झाडांना महत्त्व*  :-
झाडांना महत्त्व देण्याचे कारणही तसेच आहे.  हवेतील वाढणाऱ्या अफाट कर्बद्विवायू शोषण
झाडे करतात. हवेत प्राणवायू सोडतात.

● *झाडे काय करतात ?* :-
-- झाडे अनेक प्रकारे प्रदूषण नियंत्रण
करतात.
(१)प्रदूषित हवेत शुध्द हवा मिसळतात.
त्यामुळे हवेचा विषारीपणा कमी होतो.

(२)अनेक विषारी कण पानातून, खोडातून
व मुळ्यातून झाडाव्दारे पकडून ठेवले
जातात.

(३)झाडाव्दारे अनेक सुगंध व कीटकनाशक
  द्रव्ये हवेत सोडली जातात.

(४)वातावरणातील तापमानाची तीव्रता
    झाडामुळे कमी होते. थंड हवा उत्साह
"   वाढवते.
   थोडक्यात काय तर झाडं ही प्रदूषण
नियंत्रक आहेत. ते मानवाचे संरक्षक
आहेत. त्यांना आपण जपल्यास ते
आपले अनेक रोगांपासून संरक्षण करतील.

   ✍शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
        जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
        ता.साक्री जि.धुळे
        📞 ९४२२७३६७७५

गट अध्ययन ( Peer Grouping )


   गट अध्ययन ( Peer Grouping )

 ● गट अध्ययन म्हणजे काय ?

 -- गट अध्ययन हे कृतिशील अध्ययन -
अथ्यापनाचे हे एक माध्यम आहे.विद्यार्थ्यांना
छोट्या छोट्या गटात बसवून अध्ययनाची
संधी देणे म्हणजे गट अध्ययन होय.

--- निरीक्षण करणे, सूचनेनुसार कृती करणे,
मजकुराचे वाचन करणे, समजपूर्वक ऐकणे,
स्वाध्याय सोडविणे अशा विविध माध्यमातून
आंतरक्रियेद्वारा माहिती मिळविण्याचा
गटांत प्रयत्न करणे म्हणजे गटअध्ययन होय.

■ गट अध्ययन कशासाठी ?

-- अध्ययन -अध्यापन प्रकिया विद्यार्थी केंद्रीत
होण्यासाठी.

-- अध्ययन -अध्यापन प्रक्रिया कृतिशील
   होण्यासाठी.

-- विद्यार्थ्यांना मोकळेपणा मिळून नैसर्गिक -
रित्या अध्ययन होण्यासाठी.

-- समन्वयकांशी आंतरक्रिया घडून अध्ययन
सुलभ आणि सहजपणे होण्यासाठी.

-- एकमेकांकडून शिकणे तसेच एकमेकांना
शिकण्यास मदत करणे. यासाठी.

-- स्वत: शिकता येते यासाठीचा आत्मविश्वास
वाढविण्यासाठी.

-- अभ्यासाचे,  तसेच शिक्षकांचे दडपण कमी
करण्यासाठी.

●गटाचे स्वरूप कसे असावे ? (निकष)

 (१)समान अध्ययन स्तर असणाऱ्या
    विद्यार्थ्यांचा गट.

(२) अध्ययन स्तर उच्च,मध्यम,तसेच कमी
     असणाऱ्या विद्यार्थ्यांचा एकत्रित गट.

(३)कमीत कमी ४- ४ विद्यार्थ्यांचे आणि
   जास्तीतजास्त ६ -६ विद्यार्थ्यांचे गट
   करावेत .विद्यार्थ्यांना गटांत वर्तुळाकार/
   आयताकार बसवावे.

(४)वर्गातील विद्यार्थी संख्येवरून त्या
    वर्गासाठीची गटांची संख्या निश्चित होते.

(५)प्रत्येक गटातील एका विद्यार्थ्यास गट
     प्रमुख करावे.

■ गटांत विद्यार्थ्यांनी काय करावे  ?

-- सूचनेनुसार विद्यार्थ्यांनी गटागटांत बसावे.

-- शिक्षकांनी सांगितलेल्या सूचना लक्षपूर्वक
  ऐकाव्यात.

-- कृतीसाठी लागणारे साहित्य अध्ययन
   कोपऱ्यातून घ्यावे.

-- कृती पूर्ण करणाऱ्या सदस्याने आपली
   कृती शिक्षकांना दाखवावी.

-- शिक्षकांच्या सूचनेनुसार त्यांने इतर
   सदस्यांची कृती पाहणी करावी.

-- कृती संपल्यानंतर घेतलेले साहित्य परत
  पूर्वीच्याच ठिकाणी ठेवावे.

  संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक )
                जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                ता.साक्री जि.धुळे
                📞 ९४२२७३६७७५

विद्यार्थ्यांनो : खेळा...स्वतःला शोधा !


विद्यार्थ्यांनो : खेळा...स्वतःला शोधा !

  सुट्टीचा अतिशय उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या
माझ्या बालमित्रानो आपली बुद्धीमत्ता
ओळखण्यासाठी आणि वाढविण्यासाठी
काही खेळ दिले आहेत. ते खेळा .काही
कृती करून बघा. इतरांची निरीक्षणं करा.
योग्यप्रकारे टी. व्ही.चा वापर करून बघा.

(१)कोणतेही मैदानी खेळ खेळा.

(२)गायन, वादन,नर्तन यांपैकी जे
     आवडेल ते शिका.

(३)जोरात पळणे,संथ चालणे,सायकल
    अशा वेगवेगळ्या शर्यती लावा.

(४)व्यायाम करा.

(५)नाच करा.

(६)कलाकुसरीची कामे,हस्तकलेच्या
    वस्तू तयार करा.

(७)आपल्या गावात/सोसायटीत इतरांच्या
    मदतीने एखादा कार्यक्रम स्वतः आखा.
    उदा. स्वच्छता मोहीम /झाडं लावणं -
    झाडं जगवणं.

(८)आजी -आजोबांचे अनुभव ऐका.
   त्यांच्या लहानपणीविषयी,शाळेविषयी
   माहिती काढा.

(९)घरात बसून टी. व्ही. बघण्यापेक्षा
    बाहेर पडा.

(१०)पुस्तकांमध्ये खूप विविधता असते.
    सगळे प्रकार बघा. चरित्र, जादूच्या
    गोष्टी, विज्ञानविषयक, कविता  इ.

(११)वाचलेल्या पुस्तकांविषयी कोणाशीतरी
      बोला.

(१२)छोट्या मुलांना जमवून गोष्टी सांगा.

(१३)शब्दकोडी,चित्रकोडी सोडवा.
      विविध भाषिक खेळ खेळा.

(१४)शक्य असल्यास नवीन भाषा शिका.

(१५)अंकांशी खेळा. फावल्या वेळात
       गणिती कोडी सोडवा.

(१६)घरातल्या खर्चाचं अंदाजपत्रक तयार
      करा. जमाखर्च लिहा.

(१७)लहानांना गणित शिकवा.

(१८)जेवढी झाडं,फळं,फुलं ओळखू
     शकता त्या सर्वांविषयीची माहिती
     देणारी वही तयार करा.

(१९)निसर्गातल्या सर्वच घटकांविषयी
      सादर होणारे कार्यक्रम डिस्कव्हरी
      चॅनलवर बघा.

(२०)बी लावा. तिचं रोप कधी येतं ते बघा.
 त्याची वाढ कशी होते,याचं निरीक्षण करा.
            
(२१)चित्र काढायला आवडत असेल तर
      बघून चित्र काढण्यापेक्षा मनाने
      चित्र काढा.

(२२)वाद्य वाजवायला आवडत असेल
       तर ते शिका.

(२३) आपल्या अभ्यासाचं मूल्यमापन
       स्वतःच करा.

 संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
              जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
              ता.साक्री जि.धुळे
              📞९४२२७३६७७५