माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 4 June 2017

मुलगा - मुलगी समान हा दृष्टिकोन

   मुलगा - मुलगी समान हा दृष्टिकोन
रुजविण्यासाठी शाळेत राबवायचा उपक्रम

  मुलगा -मुलगी समान हा दृष्टिकोन आज
काळाची गरज बनला आहे. तशाप्रकारचे
बदल देखील समाजात दिसून येतआहेत.
तरी देखील प्राथमिक स्तरावर अशा प्रकारच्या
दृष्टिकोनातून मुलां -मुलीत रुजविण्याचे कार्य
प्राथमिक शिक्षकाला करावे लागते. त्यासाठी
पुढील उपक्रम राबवता येतील.

१. वर्गाचे प्रतिनिधीत्व मुलाप्रमाणे मुलींनाही*
    देण्यात यावे :-

-- याच्यामुळे मुले जी कामे करतात. ती
  मुलीसुध्दा करू शकतात. याची जाणीव
  मुला - मुलीत होईल.

________________________________

२. मुलींना धीट, निर्भय व चौकस होण्यास
    प्रोत्साहन देणे :--

-- इंदिरा गांधी, राजमाता जिजाऊ, किरण
   बेदी, कल्पना चालला इ.शूर महिलांची
   जीवनचरित्रे मुलींसमोर ठेवावी. जेणे
   करून स्वयंप्रेरणेने त्याही त्यांच्या प्रमाणे
  धीट वागायला शिकतील.
_________________________________

३. समान क्रीडा स्पर्धाचे आयोजन :--

-- मुलामुलींना समान क्रीडा स्पर्धेचे आयोजन
   केल्याने एकत्रितरीत्या खेळण्याचा आनंद
   लुटता येईल. तसेच मुले विरूद्ध मुली अशी
   खेळाची एखादी स्पर्धा घेवून दोघांनाही
   आपापली कौशल्य दाखवण्यासाठी प्रेरित
    करता येते.
_________________________________

४. बैठक व्यवस्था :--

-- मुले वेगळीकडे व मुली वेगळीकडे बसावे
   असा जो सामाजिक अट्टाहास आहे; तो
   पूर्णपणे मोडून प्रत्येकाला आपापल्या
   आवडीनुसार बसण्यास मुभा द्यावी.

 संकलन :-  शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
               जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
               ता.साक्री जि.धुळे
               📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment