माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 4 June 2017

प्रदूषण आणि पर्यावरण- रक्षण  एका दृष्टीक्षेपात

  🔹 प्रदूषण आणि पर्यावरण- रक्षण   🔹
                एका दृष्टीक्षेपात

(१) प्रदूषण :-
-- विविध कारणांमुळे,प्रामुख्याने मानवाच्या
विविध व्यवसायांमुळे परिसरात आणि
पर्यावरणात होणारे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष
अपायकारक बदल म्हणजे ' प्रदूषण' होय.

(२) बाधित घटक :-
-- प्रदूषणामुळे पर्यावरणातील जमीन,हवा,
पाणी हे तिन्ही मूलभूत घटक बाधित झाले
आहेत.

(३) प्रदूषणाचे प्रकार :-
-- भू- प्रदूषण, जलप्रदूषण,वायूप्रदूषण आणि
ध्वनिप्रदूषण हे प्रदूषणाचे चार प्रकार आहेत.

(४) प्रदूषणाचा प्रसार :-
- मानवाचा प्रत्येक व्यवसाय हा कमी -अधिक
प्रमाणात प्रदूषण करतो. मानवाचे विविध
व्यवसाय पृथ्वीवर सर्वत्र, अव्याहतपणे चालू
असल्याने या प्रदूषणाचे प्रमाण आणि व्याप्ती 
सर्वाधिक असते.

(५) शेतीमध्ये जंतुनाशके/कीटकनाशके खते :-
-- शेती व्यवसायात जंतुनाशके व कीटकनाशके वापरल्याने हवा व पाण्याचे प्रदूषण होते, तर   
खते वापरल्याने पाणी व भू- प्रदूषण होते.

(६) वाहने :-
-- वाहनांमुळे वायू व ध्वनिप्रदूषण होते.
शिवाय घरगुती कच-यामुळेही वायू, जल
व भू -प्रदूषण होते.

(७) जलप्रदूषणाचे दुष्परिणा :-
-- जलप्रदूषणामुळे नद्या, तळी, सागरकिनारे
निरुपयोगी होत आहेत. त्यामुळे शेती,
मासेमारी व्यवसायावर परिणाम होत आहे.

(८) भू -प्रदूषणाचे दुष्परिणाम :-
-- भू- प्रदूषणामुळे जमिनीची प्रत खालावत
असून जमीन वापरण्यास अयोग्य होत आहे.

(९) ध्वनिप्रदूषणाचे दुष्परिणाम :-
-- यंत्रे, वाहतूक आणि मनोरंजन आधुनिक
साधनांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण ही
आरोग्याच्या दृष्टीने एक गंभीर समस्या ठरत
आहे. बहिरेपणा, चिडचिडेपणा, निद्रानाश,
हृदयरोग इत्यादी अनेक आजार हे
ध्वनिप्रदूषणामुळे होत आहेत.

संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
               जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
               ता.साक्री जि.धुळे
              📞९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment