⚖ नियमांमागील हेतू⚖
संकलन :- शंकर चौरे(पिंपळनेर)धुळे
¤ ९४२२७३६७७५ ¤
🎯पुढे दिलेल्या नियमांमागील नेमके हेतू कोणते
ते पुढीलप्रमाणे थोडक्यात सांगता येतील.
(१) ध्वनिक्षेपकावर रात्री दहा वाजल्यानंतर बंदी -
---ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांच्या शांततेच्या
हक्कावर गदा येऊ नये व त्यांची झोपमोड
होऊ नये.
(२) मुलामुलींना मोफत प्राथमिक शिक्षण --
--- मुला-मुलींच्या हक्काच्या शिक्षणाची पूर्तता
होण्यासाठी.
(३)निर्माल्य व अन्य कचरा नदीत
टाकण्यास बंदी -
-- जलप्रदूषण रोखण्यासाठी.
(४) कौटुंबिक हिंसेपासून महिलांना संरक्षण --
---पुरूषी हिंसेला रोखणे.
(५) बालकामगारांच्या नेमणुकीस बंदी --
---अल्पवयात मुलांच्या शरीरावर होणारे परिणाम
रोखण्यासाठी व त्यांची पिळवणुकीतून सुटका
करण्यासाठी.
(६) जंगलतोड व शिकारीवर बंदी --
--- निसर्गाचे व प्राणिसृष्टीचे संरक्षण करणे तसेच
प्रदूषणापासून जनतेचे संरक्षण करणे.
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
📞९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment