चला आपण संकल्प करूया !
(१)प्रत्येक वेळी दुसर्यांमधील चांगले
गुण शोधेल, व चांगले गुण घेईल.
(२)मी आईला घरकामामध्ये मदत करेल.
घरातील छोटी -छोटी कामे करायला शिकेल.
(३)मी स्वयंप्रेरित होणार,नेहमी आनंदी उत्साही
राहील, मी कधीही निराश,हताश होणार
नाही. स्वत: दुसर्यासाठी प्रेरणास्थान बनेल.
(४)मी शूर बनेल,मी पराक्रमी बनेल. संकटांना
घाबरणार नाही.
(५)मी माझी निरीक्षण शक्ती वाढवणार.
निसर्गात खूप ज्ञान आहे. त्याचा शोध
घेत राहिल.
(६)मी घरातील टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ
व सुंदर वस्तू तयार करण्याचा प्रयत्न करेल.
(७) मी वाचनाचा छंद जोपासेल.
(८)मी माझे प्राथमिक हक्क आणि कर्तव्य
समजून घेईन.
(९)मी केरकचरा नेहमी कचरा पेटीत टाकीन.
रस्त्यावर फेकणार नाही.
(१०)मी विजेची बचत करीन,काम झाल्यावर
खोलीमधील लाईट बंद करेल.
(११)मी राष्ट्रभक्ती अंगी बाणण्याचा प्रयत्न
करेल.
(१२)मी वह्यांचा काटकसरीने वापर करेल.
(१३) वडाची लागवड आणि संवर्धन
करण्याचा प्रयत्न करेल.
(१४)मी माता -पित्यांशी प्रामाणिक वागेन
व त्यांचा आदर करेन.
(१५)मी पाण्याची बचत करीन.
(१६)मी विजेचा अपव्यय न करता विजेची
बचत करेल.
(१७)मी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळून,
पर्यावरणपूरक पिशव्यांचा वापर करीन.
संकलक :-शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment