माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 10 June 2017

उपक्रम -: वर्गसफाई व सजावट


      उपक्रम -: वर्गसफाई व सजावट

(१) उद्देश  :-
 ----  स्वच्छता,साफसफाई व्यवस्थितपणा,
  स्वावलंबन, सौंदर्यदृष्टी इ. गुणांची जोपासना
  करण्यासाठी विद्यार्थ्यांना इष्ट अशा सवयी
  लावणे. कोवळ्या वयाची मुले ज्या ठिकाणी
  दिवसातले सहा तास घालवतात त्या ठिकाणी
  अध्ययन, अध्यापनाला पोषक असे प्रसन्न
वातावरण निर्माण करणे.

(२) सहभागी घटक :-
---- वर्गशिक्षक, वर्ग मंत्रिमंडळ, वर्गातील इतर
   विद्यार्थी.

(३) कार्यपद्धती :-
   १. वर्गातील मुलांचे सोयीस्कर असे चार -पाच
    गट पाडण्यात येतील. प्रत्येक गट आपला
    गटप्रमुख निवडतील.
   २. प्रत्येक गटाला काम नेमून देण्यात येईल.
   ३. गटाच्या वाट्याला आलेले काम गडबड,
       गोंधळ, बडबड न करता उत्तम रीतीने पूर्ण
       करील.
   ४. वर्गशिक्षक, सर्व कामावर देखरेख करतील.
        मार्गदर्शन करतील. काही उपक्रमात     
        सहभागी होतील.
  
● कामाचे नियोजन :--
  १. सर्व विद्यार्थ्यांना काम मिळेल अशी
     व्यवस्था करणे.
  २ कोणत्या क्रमाने कामे करावयाची त्याचा
    क्रम निश्चित करणे. उदा. वर्गातील सर्व
   साहित्य जागच्या जागी ठेवणे,झाडून घेणे,
  उडालेला धुरळा झटकणे, रांगोळी काढणे इ.
  ३.लागणारे साहित्य आधी तयार ठेवणे.
  ४.करावयाच्या कामासंबंधी सूचना देणे.
    काम करावयाचे वेळी कोणती दक्षता
    घ्यावयाची यासंबंधी सूचना देणे.

■ साहित्य :-
  १. झाडू, टेबल, खुर्ची, फळा इ.साहित्यावरील
     धूळ झटकण्यासाठी कापड, पांढरे व रंगीत
     खडू, फुले, पाने, रांगोळी, पाणी इ.
 २ साप्ताहिक कामासाठी एक बादली, पाणी,
   बांबूला बांधलेली केरसुणी इ.

■ करावयाचा कामाचा तपशिल :--
  (A) दैनंदिन काम :-
  १ प्रत्येक गटाने कोणती कामे करावयाची
    याच्या सूचना वर्गशिक्षक देतील.
२.टेबल, खुर्ची,पेटी,कपाट,फळा,वर्गातील फोटो,
  चित्रे, तक्ते इ. साहित्य जागच्या जागी ठेवले
  जाईल. वेडेवाकडे झाले असल्यास ते व्यवस्थित
  केले जाईल. खिडक्यांचे दरवाजे नीट उघडले
  जातील.
३.हलक्या हाताने जमिनीवर पाणी शिंपडले
  जाईल. त्यामुळे जमिनीवरील धुरळ उडणार
  नाही. मुलांच्या नाकातोंडात जाणार नाही.
  वर्गाची खोली केरसुणीने झाडली जाईल.
  कानाकोपऱ्यात तसेच पेटी,कपाटामागील
  केरकचरा झाडून घेतला जाईल. केरकचरा
  एके ठिकाणी गोळा करून कचरा टाकण्यासाठी
  केलेल्या खास खड्ड्यात टाकला जाईल.
  इतर ठिकाणी टाकला जाणार नाही. एका
  साध्या फडक्याने टेबल,खुर्ची, कपाट, फळा,
  दरवाजे इत्यादी साहित्यावरील धुरळ झटकून
  घेतला जाईल.
४.वर्गातील फळा ओल्या फडक्याने स्वच्छ
  पुसला जाईल. त्यावर उजव्या वरच्या
  कोपर्‍यात वार, दिनांक, पटसंख्या,उपस्थिती
  इ. तपशील पांढर्‍या खडूने चांगल्या अक्षरात
  लिहिला जाईल.फळ्याच्या मध्यभागी वरच्या
  बाजूला सुविचार लिहिले जाईल.
 ५. काही गटाची कामे चालू असतांनाच एक
   गट पाने,फूले गोळा करून आणील.
   त्यांचे एक तोरण तयार करून दरवाजाच्या
   चौकटीला लावतील. दुसरा गट रांगोळी
   काढील. हात -पाय धुऊन आणि सजावट
   आवरून,केर काढण्याचा झाडू दृष्टीस
   पडणार नाही; असा कोपर्‍यात ठेवला जाईल.
   विद्यार्थी सामुदायिक प्रार्थनेसाठी वर्गाची
   रांग करून रांगेने जातील. ते प्रार्थनेसाठी
   नेमून दिलेल्या जागेवर जाऊन बसतील.

(B) साप्ताहिक काम :--
   शनिवार किंवा बाजाराच्या दिवशी बहुतेक
  शाळा अर्धा दिवस भरतात .अशा दिवशी
  वरील प्रमाणे सफाईची कामे करून
  घेतले जातील.
  
(C) मासिक काम :-
  महिनाच्या शेवटच्या शनिवारी वरीलप्रमाणे
 सफाईचा कार्यक्रम आखला जाईल.

■ कालमर्यादा :-
  (अ) दैनंदिन कामासाठी १० मिनिटे.
  (ब) साप्ताहिक कामासाठी १ तास.
  (क) मासिक कामासाठी २ तास.

■ अपेक्षित परिणाम :-
 १.शालेय परिसर रोजच स्वच्छ व प्रसन्न राहिल.
 २ प्रत्येक वर्गाची खोली स्वच्छ,सुंदर व
   सुशोभित राहिल.
३.शैक्षणिक साहित्याची नीट जपणूक होईल
  व त्यांचा अध्यापनात वापर होत राईल.
४.वर्गातील भिंती सुस्थितीत राहतील.
५.विद्यार्थ्यांना स्वच्छतेची सवय लागेल.

   संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
                   9422736775 (धुळे)
               

No comments:

Post a Comment