गट अध्ययन ( Peer Grouping )
● गट अध्ययन म्हणजे काय ?
-- गट अध्ययन हे कृतिशील अध्ययन -
अथ्यापनाचे हे एक माध्यम आहे.विद्यार्थ्यांना
छोट्या छोट्या गटात बसवून अध्ययनाची
संधी देणे म्हणजे गट अध्ययन होय.
--- निरीक्षण करणे, सूचनेनुसार कृती करणे,
मजकुराचे वाचन करणे, समजपूर्वक ऐकणे,
स्वाध्याय सोडविणे अशा विविध माध्यमातून
आंतरक्रियेद्वारा माहिती मिळविण्याचा
गटांत प्रयत्न करणे म्हणजे गटअध्ययन होय.
■ गट अध्ययन कशासाठी ?
-- अध्ययन -अध्यापन प्रकिया विद्यार्थी केंद्रीत
होण्यासाठी.
-- अध्ययन -अध्यापन प्रक्रिया कृतिशील
होण्यासाठी.
-- विद्यार्थ्यांना मोकळेपणा मिळून नैसर्गिक -
रित्या अध्ययन होण्यासाठी.
-- समन्वयकांशी आंतरक्रिया घडून अध्ययन
सुलभ आणि सहजपणे होण्यासाठी.
-- एकमेकांकडून शिकणे तसेच एकमेकांना
शिकण्यास मदत करणे. यासाठी.
-- स्वत: शिकता येते यासाठीचा आत्मविश्वास
वाढविण्यासाठी.
-- अभ्यासाचे, तसेच शिक्षकांचे दडपण कमी
करण्यासाठी.
●गटाचे स्वरूप कसे असावे ? (निकष)
(१)समान अध्ययन स्तर असणाऱ्या
विद्यार्थ्यांचा गट.
(२) अध्ययन स्तर उच्च,मध्यम,तसेच कमी
असणाऱ्या विद्यार्थ्यांचा एकत्रित गट.
(३)कमीत कमी ४- ४ विद्यार्थ्यांचे आणि
जास्तीतजास्त ६ -६ विद्यार्थ्यांचे गट
करावेत .विद्यार्थ्यांना गटांत वर्तुळाकार/
आयताकार बसवावे.
(४)वर्गातील विद्यार्थी संख्येवरून त्या
वर्गासाठीची गटांची संख्या निश्चित होते.
(५)प्रत्येक गटातील एका विद्यार्थ्यास गट
प्रमुख करावे.
■ गटांत विद्यार्थ्यांनी काय करावे ?
-- सूचनेनुसार विद्यार्थ्यांनी गटागटांत बसावे.
-- शिक्षकांनी सांगितलेल्या सूचना लक्षपूर्वक
ऐकाव्यात.
-- कृतीसाठी लागणारे साहित्य अध्ययन
कोपऱ्यातून घ्यावे.
-- कृती पूर्ण करणाऱ्या सदस्याने आपली
कृती शिक्षकांना दाखवावी.
-- शिक्षकांच्या सूचनेनुसार त्यांने इतर
सदस्यांची कृती पाहणी करावी.
-- कृती संपल्यानंतर घेतलेले साहित्य परत
पूर्वीच्याच ठिकाणी ठेवावे.
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक )
जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment