माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 28 February 2019

Listen / Read, carefully  and write.

   Sub :- English (भाषिक उपक्रम )
● Listen carefully and write the
    last  letter.
  ( काळजीपूर्वक ऐका व शेवटचे अक्षर लिहा.)

■ खालील शब्द गटातील शब्दांतील
     शेवटचे अक्षर लिहा.
    Question word                =        Answer
(1) cat,  bat,  mat, hat.               --      t
(2) man,  fan,  van, pan.            --      n
(3) cap,  map,  tap,  lap.             --     p
(4) mug,  jug,  bug,  rug.           --      g
(5) car,  far,  jar,  war.                --      r
(6) day,  may,  pay,  ray.            --      y
(7) bad,  mad,  pad,  sad.         --      d
(8) hot,  pot,  not,  lot.              --       t
(9) win,  tin,  sin,  pin.              --       n
(10) sea,  tea,  pea,  lea.         --       a
(11) net,  pet,  let,  wet.          --        t
(12) tip,  dip,  lip,  nip.            --        p
(13) bed,  red,  sed,  fed.      --         d
(14) big,  pig,  dig,  fig.         --         g
(15) cry,  dry,  try,  fry.          --         y
(16) gold,  fold,  told,  sold.  --        d
(17) west,  rest,  nest,  best.  --      t
(18)good, food,  wood,  mood. --   d
(19) book,  look,  hook,  cook. --    k
(20) pool,  wool,  fool,  cool.  --       l
(21) moon, noon,  soon,  boon. --  n
(22) last,  fast,  cast,  past.  --       t
(23) dear,  near,  bear,  tear.  --     r
(24) cock, lock,  rock,  sock.  --   k
(25) king,  ring,  sing,  wing. --    g
=============================
लेखन  :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             9422736775
       

Wednesday, 27 February 2019

शब्द सवंगडी

प्रजा रयत जनता
जिव्हाळा प्रेम ममता
एकी ऐक्य एकता
सकल सर्व समस्या
वैरी शत्रू दुश्मन
संग्राम लढाई रण
त्वेष आवेश स्फुरण
कुशल तरबेज निपुण
मस्तक माथा शिर
जवान सैनिक वीर
रुधिर शोणित रक्त
सोबती सवंगडी दोस्त
सैन्य फौज दल
आश्चर्य अचंबा नवल
धाडस धैर्य हिंमत
मनसुबा संकल्प बेत
धूर्त लुच्चा लबाड
भ्याड भित्रा भेकड
कलह तंटा भांडण
तीर शर बाण
समूह संघ गट
दुर्जन खल दुष्ट
राग संताप क्रोध
खून हत्या वध
चिंता काळजी फिकीर
विनाश नाश संहार
युद्ध संग्राम समर
तिमिर काळोख अंधार
संपन्नता वाढ उत्कर्ष
झुंज लढा संघर्ष
फौजी जवान सैनिक
वचक दरारा धाक
बळ सामर्थ्य शक्ती
ख्याती प्रसिद्ध कीर्ती
चाणाक्ष हुशार चतुर
राजा भूपती नरेंद्र
थोरवी महिमा माहात्म्य
सदन गृह आलय
गौरव अभिनंदन सन्मान
वंदन अभिवादन नमन      
===========================
कवी/लेखक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
                     पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
                    ९४२२७३६७७५

Sunday, 24 February 2019

निबंध लेखन -- चिमणी / गुलाब / आम्रवृक्ष

(१) चिमणी
           चिमणी हा अगदी छोटासा पक्षी आहे.
चिमणी सर्वत्र आढळते. चिमणीचा रंग करडा
असतो. इवल्याशा चोचीने ती पटपट दाणे टिपते.
तिचे पंख इवलेसे व पायही इवलेसे असतात.
ती एक एक पाय टाकत कधीच चालत नाही.
ती टुणटुण उड्या मारत चालते.
    चिमणी एका जागी स्वस्थ कधी दिसतच
नाही.  कसलीही चाहूल लागली की, ती भुर्रकन
उडते. चिमणी चिवचिव करते.
--------------------------------------------------
(२) गुलाब
           गुलाब हे अतिशय सुंदर फूल आहे.
गुलाबाच्या फुलांचे लाल, गुलाबी, पिवळा,
पांढरा असे कितीतरी रंग असतात. त्याच्या
पाकळ्या गोल व मुलायम असतात. गुलाबाच्या
सौंदर्यमुळे त्याला फुलांचा राजा मानतात.
गुलाबाच्या झाडाला काटे असतात.
       गुलाबाच्या पाकळ्यांचे अत्तर करतात.
गुलकंदही करतात.
--------------------------------------------------
(३) आम्रवृक्ष  (आंब्याचे झाड )
       आम्रवृक्ष हा इतर वृक्षांपेक्षा ऐटबाज
असतो. त्याचे खोड काळे कुळकुळीत असते.
पाने काळपट हिरवी व दाट असतात. त्यामुळे
डेरेदार दिसतो.
   वसंतऋतूमध्ये आम्रवृक्षाचे रूप विशेष सुंदर
दिसते. त्याला येणाऱ्या मोहाराने झाड फार
आकर्षक दिसते. काही दिवसांनी आम्रवृक्षावर
कै-या दिसू लागतात. नंतर कै-यांचे पिवळेधमक
आंबे होतात. कै-यांपासून लोणचे, मुरंबे करतात.
आंबा हा फळांचा राजा आहे.
--------------------------------------------------
=============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             9422736775
       

थोडक्यात उत्तर सांगा. ( सामान्यज्ञान )


(१) एकूण मुख्य दिशा किती आहेत ?
---  ४ ( चार )

(२) एकूण उपदिशा किती आहेत ?
---  ४ ( चार )

(३) प्रमुख दिशा कोणती आहे ?
---  पूर्व

(४) नकाशात वरची दिशा कोणती असते  ?
---  उत्तर

(५) नकाशात खालची दिशा कोणती असते  ?
---  दक्षिण

(६)नकाशात डाव्या हाताची दिशा कोणती असते  ?
---  पश्चिम

(७) नकाशात उजव्या हाताची दिशा कोणती असते  ?
---  पूर्व

(८) मराठी वर्षाची सुरुवात कोणत्या महिन्याने होते  ?
---  चैत्र

(९) मराठी वर्षाचा शेवट कोणत्या महिन्याने होतो  ?
---  फाल्गुन

(१०) इंग्रजी वर्षाची सुरुवात कोणत्या महिन्याने होते  ?
---  जानेवारी

(११) इंग्रजी वर्षाचा शेवट कोणत्या महिन्याने होतो  ?
---  डिसेंबर

(१२) एका वर्षाचे महिने किती  ?
---  १२  ( बारा )

(१३) ३१ दिवसाचे इंग्रजी महिने किती  ?
---   ७ ( सात )

(१४) ३० दिवसांचे इंग्रजी महिने किती  ?
---   ४ ( चार )

(१५) २९ किंवा २८ दिवसांचे महिने किती  ?
---    १  ( एक )

(१६) कोणते दोन इंग्रजी महिने लागोपाठ ३१ दिवसांचे असतात  ?
---   जुलै,  आॅगस्ट

(१७) साध्या इंग्रजी वर्षात एकूण दिवस किती  ?
---    ३६५ दिवस

(१८)लिप इंग्रजी वर्षात एकूण दिवस किती  ?
---   ३६६ दिवस

(१९) एक शेकडा  (शतक) म्हणजे किती  ?
---   १००  ( शंभर )

(२०) १ तासात सेकंद काटा पूर्ण गोल किती फेऱ्या मारतो  ?
---   ६०  ( साठ )
===========================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
            जि.प.प्रा. शाळा जामनेपाडा.
           केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
             📞९४२२७३६७७५

Friday, 22 February 2019

कारणे सांगा पाहू . (सामान्यज्ञान )

(१) उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत.

---  सुती कपडे हे कापसाच्या नैसर्गिक
 धाग्यांपासून बनलेले असतात. या धाग्यांत शरीराचा घाम शोषला जातो. तसेच त्वचा ओलसर राहून त्वचेचे विकार होण्याचा संभव कमी असतो. कृत्रिम धाग्यांपासून बनवलेले कपडे वापरले;  तर उन्हाळ्यात त्रास होतो. म्हणून उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत.
--------------------------------------------------
(२) कागद वाचवणे, ही काळाची गरज आहे.
--- कागद वृक्षांच्या ओंडक्यांच्या सालींपासून
 बनवला जातो. जेवढा कागद बनवावा लागतो.
 तेवढे वृक्ष तोडावे लागतात. कागदाच्या
 अतिवापराने मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होते.
 जंगलतोड झाल्यावर हवामानबदलासारखी
 संकटे येतात. म्हणून कागद वाचवणे, ही
 काळाची गरज आहे.
--------------------------------------------------
(३) राजस्थानमध्ये घरांना पांढरा रंग का
      देतात ?
---  राजस्थानमध्ये वातावरणाचे तापमान खूप
 जास्त असते. पांढऱ्या रंगामुळे आपाती उष्णता
 प्रारणाचे मोठ्या प्रमाणावर परावर्तन होऊन
 उष्णतेचे शोषण कमी प्रमाणात होते. म्हणून
 राजस्थानमध्ये घरांना पांढरा रंग देतात.
--------------------------------------------------
(४) उन्हाळ्यात लोंबकळणा-या टेलिफोनच्या
     तारा हिवाळ्यात समांतर झालेल्या
     दिसतात.
--- उन्हाळ्यात वातावरणाचे तापमान जास्त
 असते. तेव्हा उष्णतेने प्रसरण झाल्यामुळे
 टेलिफोनच्या तारा लोंबकळतात. हिवाळ्यात
 वातावरणाचे तापमान कमी असते. तेव्हा
 तारांचे आकुंचन झाल्याने त्या समांतर होतात.        
===========================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
            जि.प.प्रा. शाळा जामनेपाडा.
           केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
             ९४२२७३६७७५

Wednesday, 20 February 2019

सांगा सांगा उत्तर सांगा. ( सामान्यज्ञान )

(१) माणसाने प्रथम कोणत्या धातूचा उपयोग केला  ?
---  तांबे

(२)अंध व्यक्तीसाठी कोणती लिपी वापरली जाते ?
---  ब्रेल लिपी

(३) तापमापीमध्ये कोणता धातू असतो  ?
---  पारा

(४) चवदार तळे कोठे आहे  ?
---  महाड  ( रायगड )

(५) अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे  ?
---  औरंगाबाद

(६) धुळे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे  ?
---  पांझरा

(७) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते  ?
---  गंगापूर  (नाशिक )

(८) महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते  ?
---  खोपोली

(९)महाराष्ट्रातील पहिले अणूविद्युत प्रकल्प कोणते ?
---  तारापूर

(१०) पंढरपूर शहर कोणत्या नदी तीरावर आहे  ?
---  चंद्रभागा

=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             9422736775

       

Tuesday, 19 February 2019

महाराष्ट्र राज्यातील प्रमुख घाट

 कोठून कोठे जातात     ----       घाटाचे नाव
(१)नाशिक -- मुंबई       =     थळ(कसारा)घाट
----------------------------------------------
(२)कोल्हापूर -- रत्नागिरी =   आंबा घाट
-----------------------------------------------
(३)कऱ्हाड  -- चिपळूण  =    कुंभार्ली घाट
----------------------------------------------
(४)महाबळेश्वर --पोलादपूर =  आंबेनळी घाट
------------------------------------------------
(५)पुणे(मूळशीमार्गे)- माणगाव =   ताम्हाणी घाट
--------------------------------------------------
(६) पुणे   --  मुंबई     =   बोर घाट
------------------------------------------------
(७) पुणे --  सातारा  =   खंबाटकी घाट(खंडाळा)
--------------------------------------------------
(८) वाई   --  महाबळेश्वर  =   पसरणी घाट
--------------------------------------------------
(९) पुणे --   बारामती(सासवडमार्गे) = दिवा घाट
--------------------------------------------------
(१०) कोल्हापूर -- गोवा    =   फोंडा घाट (सावंतवाडीमार्गे)
--------------------------------------------------
(११) भोर   --   महाड   =    वरंधा घाट
--------------------------------------------------
(१२) पुणे   --  नाशिक   =     चंदनपुरी घाट
-------------------------------------------------
(१३) आळेफाटा  --  कल्याण  =   माळशेज  घाट
--------------------------------------------------
(१४)सावंतवाडी -- कोल्हापूर  =     अंबोली घाट ( आजरामार्गे )
--------------------------------------------------
(१५) कोल्हापूर -- राजापूर     =       अणुस्कुट घाट
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             9422736775
       

Saturday, 16 February 2019

 जलचर प्राण्यांची माहिती वैज्ञानिक स्पष्टीकरणात

               (१) मगर

       मगर हा पाण्यात व जमिनीवर राहणारा
  उभयचर प्राणी आहे. तो सरपटणारा मांसभक्षक
  प्राणी आहे. त्याचा जबडा खूप शक्तिशाली असतो.
  तो उन्हात तोंड उघडे करून आराम करतो, तेव्हा
  पक्षी त्याच्या दातात अडकलेले मांस खातात.
 कधीकधी पक्षी त्याचे भक्ष बनतात. मगर स्वतःची
 जीभ तोंडाच्या बाहेर काढू शकत नाही.
--------------------------------------------------
              (२) कासव
          कासव हा उभयचर प्राणी आहे. त्याच्या
 पाठीवर जाड व टणक कवच असते. धोक्याची
 चाहूल लागताच कासव स्वतःला कवचाच्या
 आतमध्ये लपवितो. तो जमिनीवर अतिशय
 हळूहळू चालतो, परंतु पाण्यात तो चपळ आहे.
 कासव हा शाकाहारी असून तो वनस्पती खातो.
 तो शीतरक्ताचा प्राणी आहे. कासव हा दीर्घायुष्यी
 आहे.  त्याचा जीवनकाल १०० वर्षापेक्षा जास्त
आहे.
--------------------------------------------------
               (३) मासा
        मासा हा जलचर प्राणी असून त्याच्या
 वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. माश्याला पापण्या
 नसल्याने तो डोळे उघडे ठेवून झोपतो. त्याला नाक
नसते.तो कल्ल्याच्या साहाय्याने पाण्यात आॅक्सिजन
 ग्रहण करतो. काही माश्यांच्या शरीरावर खवले
 असतात. मासे पाण्यात शेवाळ व इतर वनस्पती
 खाऊन आपले पोट भरतात तर मोठमोठे मासे
 इतर जीवांना व लहान मास्यांना खाऊन आपले
 पोट भरत असतात.
--------------------------------------------------
              (४) खेकडा
      खेकडा हा उभयचर प्राणी आहे. जगामध्ये
 खेकड्याच्या ४००० पेक्षा जास्त जाती आहेत.
 या प्राण्याला कणा नसतो, त्याला मान आणि
 डोकेही नसते. त्याला ८ पाय व संरक्षणासाठी
 दोन नांग्या असतात. खेकड्याच्या नांग्या तुटल्या
 तरी त्या काही काळाने पुन्हा उगवतात. त्याच्या
 पाठीवर कठीण आवरण असते.
--------------------------------------------------
              (५) बेडूक
       बेडूक हा पृष्ठवंशिय उभयचर व शीतरक्ताचा
 प्राणी आहे. त्याची त्वचा पाणी ग्रहण करते म्हणून
 त्याला पाणी पिण्याची गरज भासत नाही. बेडूक
 हा त्वचेद्वारे श्वसन करतो. अतिशय थंड हवामानात
 बेडूक स्वतःला जमिनीवर गाडून घेतात व दीर्घ
 निद्रा घेतात. बेडूक हा मांसाहारी असतो. नर
 बेडकाचा आवाज घोगरा, खोल आणि मोठा
 असतो.
 =============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             9422736775
       

Friday, 15 February 2019

MASCULINE  AND  FEMININE ( Gender  of  Nouns  )

   ■ पुल्लिंग  -  स्त्रीलिंगी नामे --

● He  - nouns are  called nouns of
the Masculine  gender.
   Example  :  king,  son, father, dog, cock.

● She - nouns are called  nouns of the  Feminine gender.
   Example  : queen,  daughter, mother, bitch, hen.

  Masculine      =        Feminine

(1) boy              ---         girl

(2) brother       ---        sister

(3) bull              ---        cow

(4) cock            ---        hen

(5) father          ---      mother

(6)  hero           ---      heroine

(7) horse          ---        mare

(8) husband     ---         wife

(9) king            ---       queen

(10) man          ---       woman

(11) ox             ---         cow

(12) son           ---      daughter

(13) uncle        ---        aunt
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             9422736775

       

सामान्यज्ञान ( तीन -तीन नावे सांगा.)

(१)पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत सांगा.
--- नदी,  तळे,  झरे .

(२) पाण्याचे मानवनिर्मित स्त्रोत सांगा.
---  कूपनलिका, विहिर,  धरणे.

(३) जमिनीचे घटक कोणते  ?
---  माती, दगड,  खडक,

(४) तुम्हाला जमिनीवर काय काय दिसते  ?
---  डोंगर, नद्या, झाडे.

(५) मातीचे विविध घटक कोणते  ?
---  माती, वाळू, दगड.

(६) मानवासाठी अपायकारक सजीव सांगा.
---  डास, घरमाशी, उवा.

(७) मोठ्या वृक्षांची नावे सांगा.
---  वड, आंबा, चिंच.

(८) पाठीचा कणा असलेले प्राणी सांगा.
---  मानव, मासा, पक्षी.

(९) पाठीचा कणा नसलेले प्राणी सांगा.
---  गांडूळ,  तारामासा, गोगलगाय.

(१०) अंडी घालणारे प्राणी सांगा.
---    साप, पक्षी, मासे.

(११) पिल्लांना जन्म देणारे प्राणी सांगा.
---   गाय, म्हैस, मांजर.

(१२) जलचर प्राण्यांची नावे सांगा.
---   मासा,  बेडूक, कासव.

(१३) पर्वतांची नावे सांगा.
---    हिमालय, सह्याद्री, सातपुडा.

(१४) नद्यांची नावे सांगा.
---   गोदावरी, नर्मदा,  गंगा.

(१५) प्राण्यांची निवारे सांगा.
---     घरटे, घर, गोठा.

(१६) धरणांची नावे सांगा.
---   भंडारदरा,  गंगापूर,  जायकवाडी.

(१७) धातूंची नावे सांगा.
---  तांबे, लोखंड,  चांदी

(१८) किटकांची नावे सांगा.
---  मुंगी,  झुरळ, फुलपाखरू.

=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             ९४२२७३६७७५

    

Wednesday, 13 February 2019

Listen / Read,  carefully  and write.

● Listen carefully and write the first letter.
  ( काळजीपूर्वक ऐका व पहिले अक्षर लिहा. )

■ खालील शब्द गटातील शब्दांतील
     पहिले अक्षर लिहा.

(1) bat,     box,     bed,     bus .   --    b

(2) cat,     cow,     cup,     cap .   --    c

(3) pen,    pad,      pin,      pot .   --    p

(4) man ,  mug,    map,    mat .  --   m

(5) ten,      tea,      tin,       top.   --   t

(6) dog,    day,      den,     dot.   --   d

(7) ant,     all,        axe,      air.   --    a

(8) jug,     joy,        jar,       jam.  --    j

(9) net,    not,       nib,       nut   --    n

(10) six,   sun,      sky,      sea.  --    s

(11) red,   rug,      run,       rat.   --    r

(12) fox,   fan,        fly,       for     --   f

(13) hut,   hat,       hen,      hot.   --   h

(14) eat,  eye,       egg,       ear.    --  e

(15) wall,  well,      will,     wood.  --   w

(16) ball,   book,   band,     bell. --      b

(17) food,  fish,     face,     frog.   --   f

(18) cool,  cook,    cold,    cock. --    c

(19) key,     kite,      kill,     King.  --   k

(20) good,   gold,    girl,     goat.  --   g

=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             9422736775

       

Tuesday, 12 February 2019

कागदमापन -- डझन, रीम, दस्ता  प्रश्नावली

-------------------------------------
● १२ वस्तू  = १ डझन

● १२ डझन = १ ग्रोस
● १२ डझन  = १४४ कागद
● १ ग्रोस  = १४४ कागद.
● २४ कागद  = १ दस्ता
● १ दस्ता  = २ डझन कागद.
● २० दस्ते  = १ रीम कागद.
● १ रीम  = ४८० कागद.
----------------------------------------
(१) १२ कागद = किती डझन कागद  ?
---  १ डझन
(२) १ दस्ता कागद = किती कागद  ?
---  २४ कागद
(३) १ रीम कागद  = किती कागद  ?
---  ४८०  कागद
(४) २ दस्ते कागद  = किती कागद  ?
---  ४८ कागद
(५) १ रीम कागद  = किती डझन कागद  ?
---  ४० डझन कागद
(६) १ ग्रोस कागद  = किती डझन कागद  ?
---  १२ डझन    (१४४ कागद )
(७) १ रीम कागद  = किती दस्ते कागद  ?
---  २० दस्ते कागद  ( ४८० कागद )
(८) ६० कागद  = किती डझन कागद  ?
---  ५ डझन
(९) २ रीम कागद  = किती दस्ते कागद  ?
---  ४० दस्ते कागद
(१०) २ डझन कागद + १ ग्रोस कागद = किती
       डझन कागद  ?
---  १४ डझन कागद
(११) ९६० कागदांचे किती रीम कागद होतील  ?
---  २ रीम कागद
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             ९४२२७३६७७५
       

Monday, 11 February 2019

म्हणजे काय ? (जलावरण - सामान्यज्ञान )

(१) सागर म्हणजे काय ?
---  जमिनीने पूर्णः किंवा अंशतः वेढलेल्या
      खा-या पाण्याचा जलभाग म्हणजे सागर
      किंवा समुद्र होय.

(२) महासागर म्हणजे काय  ?
---  दोन खंडांदरम्यान पसरलेला खा-या
      पाण्याचा विस्तीर्ण (मोठा) साठा म्हणजे महासागर होय.

(३) उपसागर म्हणजे काय  ?
---  सर्वसाधारणपणे जमिनीने तीन बाजूंनी
      वेढला गेलेला सागराचा लहान भाग म्हणजे
      उपसागर होय. उदा. बंगालचा उपसागर.

(४) आखात म्हणजे काय  ?
---  जमिनीत घुसलेला सागराचा अरुंद भाग,
       म्हणजे आखात होय.

(५) सरोवर म्हणजे काय  ?
---  भूपृष्ठावरील सखल भागात नैसर्गिकरीत्या
      तयार झालेला जलाशय म्हणजे सरोवर होय.

(६) जलावरण म्हणजे काय  ?
---  पृथ्वीवरील पाण्याने व्यापलेला भाग,
      म्हणजे जलावरण होय.

(७) खाडी म्हणजे काय  ?
---  समुद्राचे पाणी नदीच्या मुखातून जेथेपर्यंत
      नदीत शिरते, त्या नदीच्या भागाला खाडी म्हणतात.

(८) सागरी मैदान म्हणजे काय  ?
---  सागरतळाचा सपाट व सखल भाग
      म्हणजे सागरी मैदान होय.

(९) गर्ता म्हणजे काय  ?
---  सागरातील अरुंद व अतिखोल भागास गर्ता म्हणतात.

(१०) सागरी डोह म्हणजे काय  ?
---   सागरतळावर काही ठिकाणी खोल, अरुंद
       आणि तीव्र उतारांची सागरी भूरूपे आढळतात.
    त्यातील कमी खोलीच्या अरुंद व तीव्र उतारांची
    सागरी भूरूपे म्हणजे सागरी डोह होय.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             ९४२२७३६७७५

       

Sunday, 10 February 2019

चला जाणून घेऊया, भारताची सुरक्षा व्यवस्थेची माहिती

(१) राष्ट्रीय सुरक्षा :-
     (1) राष्ट्रीय सुरक्षा अबाधित ठेवणाऱ्या
          उपाययोजनांना  'राष्ट्रीय सुरक्षा ' असे म्हणतात. 
     (2) देशाचे संरक्षण ही त्या देशाच्या शासनाची
          जबाबदारी असते;  तर त्या कार्यात सहभागी
          होणे, ही नागरिकांची जबाबदारी असते.
     (3) सेनादलांना मदत करण्यासाठी निम -
          लष्करी दले तसेच संरक्षण करणारी यंत्रणा
          व व्यवस्था अद्यावत ठेवावी लागते.

(२) राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेची गरज :-
           (1) राष्ट्राराष्ट्रांतील संघर्षाच्या वेळी
     भौगोलिक अखंडतेला आणि सार्वभौमत्वाला
     धोके निर्माण होतात. (2) या संघर्षाचे
     शांततेच्या मार्गाने निराकरण झाले नाही;
     तर युद्धाचा धोका संभवतो. (3) अशा
     परिस्थितीत राष्ट्राच्या अस्तित्वाचे,  ऐक्याचे
     आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी
     प्रत्येक राष्ट्राला आपली सेनादले सुसज्ज
     ठेवावी लागतात. (4) देशाची सुरक्षा व्यवस्था
    बळकट असल्यास देशाच्या विकासासालाही
     पोषक वातावरण तयार होते.

(३) भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे स्वरूप :-
    (1) भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी
       भारताचे राष्ट्रपती असून;  ते तिन्ही सेनादलाचे 
       सरसेनापती असतात. (2) मंत्रिमंडळाच्या
       सल्ल्याने पंतप्रधान आपले संरक्षणविषयक धोरण ठरवतात.

(४) भारतातील निमलष्करी दले  :-

    (1) सीमा सुरक्षा दल  :-
        ●सीमा भागात नागरिकांच्या मनात
          सुरक्षिततेची भाग निर्माण करणे.
       ● सीमेवर गस्त घालणे.

     (2) तटरक्षक दल :-
        ● सागरी किना-यांचे रक्षण करणे.

   (3)केंद्रीय राखीव पोलीस दल  :-
         कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या
         कामी विविध राज्यांतील प्रशासनास मदत करणे.

    (4) जलद कृती दल  :-
        बॉम्बस्फोट,  दंगे यांमुळे देशाच्या सुरक्षेस
        धोका निर्माण झाल्यास वेगवान हालचाली
        करून जनजीवन सुरळीत करणे.

   (5) गृहरक्षक दल  :-
        1. सार्वजनिक सुरक्षितता राखणे, दंगल व
        बंद या काळात नागरिकांना दूध, पाणी,
        औषधे इ. वस्तूचा पुरवठा करण्यात मदत.
        करणे. 2 भूकंप, पूर अशा नैसर्गिक आपत्तीच्या
        वेळी लोकांना मदत करणे.
==============================
● सेनादलाचे (सैन्यदले )  तीन प्रकार  :-
  (1) भूदल :-
       भारताच्या भौगोलिक सीमांचे संरक्षण
     करणे, हे भूदलाचे काम आहे.

  (2) नौदल  :-
     भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करण्याची
     जबाबदारी नौदलावर आहे.

 (3) वायुदल  :-
      वायुदलावर भारताच्या हवाई सीमांचे
      व अवकाशाचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे.
    
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             ९४२२७३६७७५

    

    

               
        

Saturday, 9 February 2019

दिवस,  आठवडा, महिने व वर्ष

          ( सामान्यज्ञान )
(१) दिवस :-
---  सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंतचा जो
       काळ त्याला दिवस म्हणतात.

(२) रात्र :-
---   सूर्य मावळल्यापासून तो पुन्हा उगवेपर्यंतचा
       जो काळ त्याला रात्र म्हणतात.
(३) पूर्ण दिवस :-
---  सूर्य उगवून मावळतो आणि पुन्हा उगवतो.
      या संपूर्ण काळाला पूर्ण दिवस समजतात.
      दिवस आणि रात्र मिळून २४ तासांचा पूर्ण  दिवस होतो.
(४) आठवडा :-
---  सात दिवसांचा (वारांचा) आठवडा होतो.
(५) मराठी वर्ष :-
--- मराठी वर्ष हे १२ चांद्रमासांचे बनलेले आहे.
     या प्रत्येकाला आपण मराठी महिना म्हणतो.
         उदा.  चैत्र,  वैशाख,......  फाल्गुन.
     मराठी वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होते.
     या दिवसाला गुढीपाडवा म्हणतात.

(६) इंग्रजी वर्ष  :-
---  इंग्रजी वर्षाचे १२ महिने असतात.
        उदा.  जानेवारी, फेब्रुवारी,.... डिसेंबर.
     इंग्रजी वर्ष ३६५ किंवा ३६६ दिवसांचे असते.
  ● लीप वर्ष (३६६ दिवस) हे दर चार वर्षांनी
      येते. लीप वर्षात फेब्रुवारी महिन्याचे २९
      दिवस असतात.
(७) सौरवर्ष :-
---  भारतीय परंपरेनुसार तयार केलेले वर्ष हे
      सौरवर्ष होय. सौरवर्ष १२ महिन्यांचे म्हणजे
      ३६५ दिवसांचे असते. सौरवर्षातील महिन्यांची
      नावे मराठी महिन्यांप्रमाणेच आहेत.
(८) चांद्रमास :-
---  चांद्रमासाचे दोन पक्ष (पंधरवाडे) असतात.
      पहिला चांदण्याचा पंधरवडा म्हणजे शुक्ल
      (शुद्ध) पक्ष आणि दुसरा काळोखाचा पंधरवडा
      म्हणजे कृष्ण(वद्य) पक्ष.
  
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             ९४२२७३६७७५
    
    

Friday, 8 February 2019

आपला महाराष्ट्र -- प्रश्नावली

(१) महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली  ?

---  १ मे १९६०
(२) महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे  ?
---  मुंबई
(३) महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती  ?
---  नागपूर
(४) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे  ?
---  अरबी
(५) महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत  ?
---   ३६
(६) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता  ?
---  अहमदनगर
(७) कोणता दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो  ?
---   १ मे
(८) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते  ?
---  कळसूबाई
(९) महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती  ?
---  तापी / नर्मदा  इ.
(१०) महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी कोणती  ?
---     गोदावरी
(११) सातपुडा पर्वातील सर्वांत उंच ठिकाण कोणते  ?
---    अस्तंभा
(१२) कळसूबाई शिखराची उंची किती आहे ?
---   १६४६  मीटर
(१३) गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे  ?
---     त्र्यंबकेश्वर (नाशिक)
(१४) कोकणातील नद्या कोणत्या समुद्रास मिळतात  ?
---     अरबी 
(१५) कृष्णा नदीचा उगम कोठे झाला आहे  ?
---   महाबळेश्वर ( सातारा )
(१६) साल्हेर शिखर कोणत्या जिल्हात आहे  ?
---   नाशिक
(१७) महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे  ?
---   आंबा 
(१८) महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे  ?
---    हरियाल
(१९) महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे  ?
---    शेकरू  
(२०) भीमा नदीचा उगम कोठे झाला आहे  ?
---    भीमाशंकर  ( पुणे )
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             ९४२२७३६७७५
    

Thursday, 7 February 2019

ओळखा पाहू --  मी कोण आहे  ?

(१) मी तुमच्या शरीराचा अवयव आहे.
     मी तुम्हांला खायला मदत करतो.
     मी तुम्हांला बोलायला मदत करतो.
     मी कोण आहे  ?

------------------------------------


(२) माझा स्पर्श तूम्हांला जाणवू शकतो; 
     परंतु तुम्ही मला स्पर्श करू शकणार
     नाही किंवा पाहू शकणार नाही. तुम्ही
     माझ्याशिवाय जगू शकणार नाही.
     मी कोण आहे  ?
----------------------------------------------
(३) मी जमिनीवरील सर्वांत मोठा प्राणी
     आहे. मी माझ्या नाकाने वास घेतो,
    पाने व फळे खुडतो आणि पाणी पितो.
    मी माझ्या नाकाचा हातासारखा उपयोग
    करतो. मी कोण आहे  ?
----------------------------------------------
(४) मी काळा, पिवळा कीटक आहे.
     मी मध गोळा करते. तुम्ही मला त्रास
     दिलात, तर मी तुम्हांला दंश करीन.
    मी कोण आहे  ?
----------------------------------------------
उत्तरे :-(१) तोंड , (२) हवा, (३) हत्ती, (४) मधमाशी.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             ९४२२७३६७७५
    

Wednesday, 6 February 2019

शब्दांची वैज्ञानिक अर्थात व्याप्ती

        ( सामान्यज्ञान )

● काही शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. या
  शब्दांच्या अर्थाची वैज्ञानिक व्याप्ती
   लक्षात ठेवा.

 (१) इंधन --
--- जळणासाठी उपयुक्त पदार्थ.

(२) मिठागर --
 --- समुद्रकाठावरची मीठ तयार करण्याची जागा.

(३) तर्जनी --
---  अंगठ्याशेजारचे बोट.

(४) उष्माघात --
---  सूर्याच्या उष्णतेने शरीरावर होणारा दुष्परिणाम.

(५) कुपोषण --
 ---  अन्नाची किंवा अन्नघटकांची कमतरता.

(६) कु-हाडबंदी --
---   झाडे तोडण्यास बंदी.

(७) चराईबंदी --
---  गुरे चारण्यास बंदी.

(८) चुंबकीय पदार्थ --
---  चुंबकाकडे आकर्षित होणारा पदार्थ.

(९) जलशुद्धीकरण --
---   पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया.

(१०) नैसर्गिक --
---    निसर्गतः मिळणारे.

(११) भूगर्भ --
 --- जमिनीच्या आतील भाग.

(१२) मानवनिर्मित --
 ---   माणसाने निर्माण केलेले.

(१३) रक्ताभिसरण --
---   शरीरात नलिकांमधून रक्त फिरत राहण्याची क्रिया.

(१४) रक्तवाहिन्या --
 ---    शरीरात रक्त वाहून नेणाऱ्या नळ्या.

(१५) रोगजंतू --
 ---    रोगास कारणीभूत ठरणारे सूक्ष्मजीव.

(१६) रोगप्रतिबंध --
---     रोगाला आळा घालणे.

(१७) श्वास --
---    नाकाने हवा फुप्फुसात घेण्याची कृती.

(१८) श्वासनलिका --
---     फुप्फुसात हवा जाण्यासाठी नळी.

(१९) श्वासोच्छवास --
---    श्वास आणि उच्छ्वास या एकापाठोपाठ होणाऱ्या क्रिया.

(२०) संपर्कजन्य रोग --
---   बाधित व्यक्तिच्या निकट स्पर्शाने होणारे रोग.

(२१) संसर्गजन्य रोग --
---   बाधित व्यक्तीच्या सांनिध्याने होणारे रोग.

(२२) साथीचे रोग --
---   एका वेळी अनेक लोकांना बाधा करणारे रोग.

(२३) स्टेथोस्कोप --
---     हृदयाचे ठोके मोजण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्र.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             ९४२२७३६७७५

    

Tuesday, 5 February 2019

चला शिकूया इंग्रजी भाषा

 चल ग आशा
 चल ग उषा
 आपण शिकू इंग्रजी भाषा  || धृ  ||

 आईला म्हणू मदर
 बाबाला म्हणू  फादर
 भावाला म्हणू ब्रदर      
 बहिणीला म्हणू सिस्टर     || १ ||

 माणसाला म्हणू  मॅन
 पंख्याला म्हणू फॅन
 कोंबडीला म्हणू हेन
 लेखणीला म्हणू पेन    || २ ||

 चेंडूला म्हणू बाॅल
 भिंतीला म्हणू वाॅल
 उंचला म्हणू टाॅल
 बाहुलीला म्हणू डाॅल    || ३ ||

 उंदराला म्हणू रॅट
 मांजरीला म्हणू कॅट
 टोपीला म्हणू हॅट
 झोपडीला म्हणू हट     || ४ ||

 पलंगाला म्हणू काॅट
 गरमला म्हणू हाॅट
 ठिपक्याला म्हणू डाॅट
 जाळीला म्हणू नेट       || ५ ||

 हाताला म्हणू हॅन्ड
 बाजाला म्हणू बॅन्ड
 जमिनीला म्हणू लॅन्ड
 वाळूला म्हणू सॅन्ड      || ६  ||

 सूर्याला म्हणू सन
 बंदूकीला म्हणू गन
 पळण्याला म्हणू रन
 टाचणीला म्हणू पिन   || ७ ||

 पुस्तकाला म्हणू बूक
 खिळ्याला म्हणू हूक
आचारीला म्हणू कूक
 पाहण्याला म्हणू लूक    || ८ ||

 अन्नाला म्हणू फूड
 चांगल्याला म्हणू गुड
 लाकडाला म्हणू वूड 
 देवाला म्हणू गाॅड       || ९ ||

 सोन्याला म्हणू गोल्ड
 विकण्याला म्हणू सोल्ड
 थंडला म्हणू कोल्ड
 घडीला म्हणू फोल्ड      || १० ||

 भाताला म्हणू राईस
 बर्फाला म्हणू आईस
 पसंदला म्हणू चाॅईस
 छानला म्हणू नाईस     || ११ ||

 होडीला म्हणू बोट
 शेळीला म्हणू गोट
 मूळला म्हणू रूट
 कापण्याला म्हणू कट   || १२ ||

 घंट्याला म्हणू बेल
 विहिरीला म्हणू वेल
 आगगाडीला म्हणू रेल
 शेपटीला म्हणू टेल     || १३ ||

 टेकडीला म्हणू हिल
 गिरणीला म्हणू मिल
तळ्याला म्हणू पूल
 लोकरला म्हणू वूल     || १४ ||

 संघाला म्हणू टीम
 अंधूकला म्हणू डीम
 खेळाला म्हणू गेम
 नावाला म्हणू नेम      || १५ ||

रात्रला म्हणू नाईट
प्रकाशला म्हणू लाईट
घट्टला म्हणू टाईट
लढणेला म्हणू फाईट   || १६ ||

 रडण्याला म्हणू क्राॅय
 कोरडेला म्हणू ड्राॅय
 तळणेला म्हणू फ्राॅय
 प्रयत्नाला म्हणू ट्राॅय     || १७ ||

 युद्धाला म्हणू वार
 गजला म्हणू बार
 डांबरला म्हणू टार
 बरणीला म्हणू जार     || १८ ||

 बैलाला म्हणू आॅक्स
 कोल्ह्याला म्हणू फाॅक्स
खोक्याला म्हणू बाॅक्स
 सहाला म्हणू सिक्स     || १९ ||

================================
लेखक /कवी :-- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक )
                    पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
                     ९४२२७३६७७५

Sunday, 3 February 2019

चला आपण विविध वनस्पतींची माहिती घेऊया.

(१) औषधी वनस्पती  --
      हिरडा , कुंभा , पळस , मोहा , जांभुळ,
      खैर , बेल , आवळा , बेहडा .
-----------------------------------------------

(२) औषधी झुडपे  --
      तुळस , आंबे हळद , सर्पगंधा , अश्वगंधा ,वेखंड.
-----------------------------------------------

(३) वेलवर्गीय औषधी वनस्पती --
       शतावरी , गुळवेल , कांडवेल .   
----------------------------------------------

(४) परसबागेमध्ये लागवडी योग्य औषधी वनस्पती --
     कोरफड , तुळस , गवतीचहा , सब्जा ,
     पुदीना , पान ओवा , कढीपत्ता , अडुळसा .
------------------------------------------------

(५) फुलशेतीच्या वनस्पती --
     गुलाब ,  निशिगंधा , अॅस्टर , झेंडू , शेवंती ,
-----------------------------------------------

(६) फळवर्गीय वनस्पती --
      द्राक्षे , डाळिंब , सीताफळ , अंजीर , बोर ,
      चिकू  , नारळ , चिंच, जांभूळ ,  पेरू ,
      आवळा , मोसंबी , स्ट्रॉबेरी , पपई ,
----------------------------------------------

(७) भाजीपाला फळवर्गीय वनस्पती --
        वांगी , टोमॅटो , भेंडी .
-----------------------------------------------

(८) वेलवर्गीय भाजीपाला वनस्पती --
        कारली ,  काकडी , दुधी भोपळा ,
     दोडका , घेवडा , वाल .
----------------------------------------------

(९) मूळवर्गीय भाजीपाला --
          मुळा , गाजर , बीट , रताळे , अळू .
----------------------------------------------

(१०) मसाला पदार्थ वनस्पती --
     हळद , लसूण , मिरची , आले , मिरी , जिरे .
----------------------------------------------

(११) वेलवर्गीय फळे --
         टरबूज , काकडी , खरबूज .
--------------------------------------------

(११) पानवर्गीय भाज्या --
         मेथी , कोथिंबीर , पालक , कोबी .
----------------------------------------------

(१२) शेंगवर्गीय भाजीपाला --
         गवार , मटार , शेवगा , चवळी .
--------------------------------------------------

(१३)भक्कम खोडाच्या वनस्पती --
        वड , पिंपळ , आंबा , चिंच , गुलमोहर .
------------------------------------------------
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             ९४२२७३६७७५