माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 16 February 2019

 जलचर प्राण्यांची माहिती वैज्ञानिक स्पष्टीकरणात

               (१) मगर

       मगर हा पाण्यात व जमिनीवर राहणारा
  उभयचर प्राणी आहे. तो सरपटणारा मांसभक्षक
  प्राणी आहे. त्याचा जबडा खूप शक्तिशाली असतो.
  तो उन्हात तोंड उघडे करून आराम करतो, तेव्हा
  पक्षी त्याच्या दातात अडकलेले मांस खातात.
 कधीकधी पक्षी त्याचे भक्ष बनतात. मगर स्वतःची
 जीभ तोंडाच्या बाहेर काढू शकत नाही.
--------------------------------------------------
              (२) कासव
          कासव हा उभयचर प्राणी आहे. त्याच्या
 पाठीवर जाड व टणक कवच असते. धोक्याची
 चाहूल लागताच कासव स्वतःला कवचाच्या
 आतमध्ये लपवितो. तो जमिनीवर अतिशय
 हळूहळू चालतो, परंतु पाण्यात तो चपळ आहे.
 कासव हा शाकाहारी असून तो वनस्पती खातो.
 तो शीतरक्ताचा प्राणी आहे. कासव हा दीर्घायुष्यी
 आहे.  त्याचा जीवनकाल १०० वर्षापेक्षा जास्त
आहे.
--------------------------------------------------
               (३) मासा
        मासा हा जलचर प्राणी असून त्याच्या
 वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. माश्याला पापण्या
 नसल्याने तो डोळे उघडे ठेवून झोपतो. त्याला नाक
नसते.तो कल्ल्याच्या साहाय्याने पाण्यात आॅक्सिजन
 ग्रहण करतो. काही माश्यांच्या शरीरावर खवले
 असतात. मासे पाण्यात शेवाळ व इतर वनस्पती
 खाऊन आपले पोट भरतात तर मोठमोठे मासे
 इतर जीवांना व लहान मास्यांना खाऊन आपले
 पोट भरत असतात.
--------------------------------------------------
              (४) खेकडा
      खेकडा हा उभयचर प्राणी आहे. जगामध्ये
 खेकड्याच्या ४००० पेक्षा जास्त जाती आहेत.
 या प्राण्याला कणा नसतो, त्याला मान आणि
 डोकेही नसते. त्याला ८ पाय व संरक्षणासाठी
 दोन नांग्या असतात. खेकड्याच्या नांग्या तुटल्या
 तरी त्या काही काळाने पुन्हा उगवतात. त्याच्या
 पाठीवर कठीण आवरण असते.
--------------------------------------------------
              (५) बेडूक
       बेडूक हा पृष्ठवंशिय उभयचर व शीतरक्ताचा
 प्राणी आहे. त्याची त्वचा पाणी ग्रहण करते म्हणून
 त्याला पाणी पिण्याची गरज भासत नाही. बेडूक
 हा त्वचेद्वारे श्वसन करतो. अतिशय थंड हवामानात
 बेडूक स्वतःला जमिनीवर गाडून घेतात व दीर्घ
 निद्रा घेतात. बेडूक हा मांसाहारी असतो. नर
 बेडकाचा आवाज घोगरा, खोल आणि मोठा
 असतो.
 =============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             9422736775
       

No comments:

Post a Comment