( सामान्यज्ञान )
● काही शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. या
शब्दांच्या अर्थाची वैज्ञानिक व्याप्ती
लक्षात ठेवा.
(१) इंधन --
--- जळणासाठी उपयुक्त पदार्थ.
(२) मिठागर --
--- समुद्रकाठावरची मीठ तयार करण्याची जागा.
(३) तर्जनी --
--- अंगठ्याशेजारचे बोट.
(४) उष्माघात --
--- सूर्याच्या उष्णतेने शरीरावर होणारा दुष्परिणाम.
(५) कुपोषण --
--- अन्नाची किंवा अन्नघटकांची कमतरता.
(६) कु-हाडबंदी --
--- झाडे तोडण्यास बंदी.
(७) चराईबंदी --
--- गुरे चारण्यास बंदी.
(८) चुंबकीय पदार्थ --
--- चुंबकाकडे आकर्षित होणारा पदार्थ.
(९) जलशुद्धीकरण --
--- पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया.
(१०) नैसर्गिक --
--- निसर्गतः मिळणारे.
(११) भूगर्भ --
--- जमिनीच्या आतील भाग.
(१२) मानवनिर्मित --
--- माणसाने निर्माण केलेले.
(१३) रक्ताभिसरण --
--- शरीरात नलिकांमधून रक्त फिरत राहण्याची क्रिया.
(१४) रक्तवाहिन्या --
--- शरीरात रक्त वाहून नेणाऱ्या नळ्या.
(१५) रोगजंतू --
--- रोगास कारणीभूत ठरणारे सूक्ष्मजीव.
(१६) रोगप्रतिबंध --
--- रोगाला आळा घालणे.
(१७) श्वास --
--- नाकाने हवा फुप्फुसात घेण्याची कृती.
(१८) श्वासनलिका --
--- फुप्फुसात हवा जाण्यासाठी नळी.
(१९) श्वासोच्छवास --
--- श्वास आणि उच्छ्वास या एकापाठोपाठ होणाऱ्या क्रिया.
(२०) संपर्कजन्य रोग --
--- बाधित व्यक्तिच्या निकट स्पर्शाने होणारे रोग.
(२१) संसर्गजन्य रोग --
--- बाधित व्यक्तीच्या सांनिध्याने होणारे रोग.
(२२) साथीचे रोग --
--- एका वेळी अनेक लोकांना बाधा करणारे रोग.
(२३) स्टेथोस्कोप --
--- हृदयाचे ठोके मोजण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्र.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment