माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 15 February 2019

सामान्यज्ञान ( तीन -तीन नावे सांगा.)

(१)पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत सांगा.
--- नदी,  तळे,  झरे .

(२) पाण्याचे मानवनिर्मित स्त्रोत सांगा.
---  कूपनलिका, विहिर,  धरणे.

(३) जमिनीचे घटक कोणते  ?
---  माती, दगड,  खडक,

(४) तुम्हाला जमिनीवर काय काय दिसते  ?
---  डोंगर, नद्या, झाडे.

(५) मातीचे विविध घटक कोणते  ?
---  माती, वाळू, दगड.

(६) मानवासाठी अपायकारक सजीव सांगा.
---  डास, घरमाशी, उवा.

(७) मोठ्या वृक्षांची नावे सांगा.
---  वड, आंबा, चिंच.

(८) पाठीचा कणा असलेले प्राणी सांगा.
---  मानव, मासा, पक्षी.

(९) पाठीचा कणा नसलेले प्राणी सांगा.
---  गांडूळ,  तारामासा, गोगलगाय.

(१०) अंडी घालणारे प्राणी सांगा.
---    साप, पक्षी, मासे.

(११) पिल्लांना जन्म देणारे प्राणी सांगा.
---   गाय, म्हैस, मांजर.

(१२) जलचर प्राण्यांची नावे सांगा.
---   मासा,  बेडूक, कासव.

(१३) पर्वतांची नावे सांगा.
---    हिमालय, सह्याद्री, सातपुडा.

(१४) नद्यांची नावे सांगा.
---   गोदावरी, नर्मदा,  गंगा.

(१५) प्राण्यांची निवारे सांगा.
---     घरटे, घर, गोठा.

(१६) धरणांची नावे सांगा.
---   भंडारदरा,  गंगापूर,  जायकवाडी.

(१७) धातूंची नावे सांगा.
---  तांबे, लोखंड,  चांदी

(१८) किटकांची नावे सांगा.
---  मुंगी,  झुरळ, फुलपाखरू.

=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             ९४२२७३६७७५

    

No comments:

Post a Comment