माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 24 February 2019

निबंध लेखन -- चिमणी / गुलाब / आम्रवृक्ष

(१) चिमणी
           चिमणी हा अगदी छोटासा पक्षी आहे.
चिमणी सर्वत्र आढळते. चिमणीचा रंग करडा
असतो. इवल्याशा चोचीने ती पटपट दाणे टिपते.
तिचे पंख इवलेसे व पायही इवलेसे असतात.
ती एक एक पाय टाकत कधीच चालत नाही.
ती टुणटुण उड्या मारत चालते.
    चिमणी एका जागी स्वस्थ कधी दिसतच
नाही.  कसलीही चाहूल लागली की, ती भुर्रकन
उडते. चिमणी चिवचिव करते.
--------------------------------------------------
(२) गुलाब
           गुलाब हे अतिशय सुंदर फूल आहे.
गुलाबाच्या फुलांचे लाल, गुलाबी, पिवळा,
पांढरा असे कितीतरी रंग असतात. त्याच्या
पाकळ्या गोल व मुलायम असतात. गुलाबाच्या
सौंदर्यमुळे त्याला फुलांचा राजा मानतात.
गुलाबाच्या झाडाला काटे असतात.
       गुलाबाच्या पाकळ्यांचे अत्तर करतात.
गुलकंदही करतात.
--------------------------------------------------
(३) आम्रवृक्ष  (आंब्याचे झाड )
       आम्रवृक्ष हा इतर वृक्षांपेक्षा ऐटबाज
असतो. त्याचे खोड काळे कुळकुळीत असते.
पाने काळपट हिरवी व दाट असतात. त्यामुळे
डेरेदार दिसतो.
   वसंतऋतूमध्ये आम्रवृक्षाचे रूप विशेष सुंदर
दिसते. त्याला येणाऱ्या मोहाराने झाड फार
आकर्षक दिसते. काही दिवसांनी आम्रवृक्षावर
कै-या दिसू लागतात. नंतर कै-यांचे पिवळेधमक
आंबे होतात. कै-यांपासून लोणचे, मुरंबे करतात.
आंबा हा फळांचा राजा आहे.
--------------------------------------------------
=============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             9422736775
       

No comments:

Post a Comment