माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 22 February 2019

कारणे सांगा पाहू . (सामान्यज्ञान )

(१) उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत.

---  सुती कपडे हे कापसाच्या नैसर्गिक
 धाग्यांपासून बनलेले असतात. या धाग्यांत शरीराचा घाम शोषला जातो. तसेच त्वचा ओलसर राहून त्वचेचे विकार होण्याचा संभव कमी असतो. कृत्रिम धाग्यांपासून बनवलेले कपडे वापरले;  तर उन्हाळ्यात त्रास होतो. म्हणून उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत.
--------------------------------------------------
(२) कागद वाचवणे, ही काळाची गरज आहे.
--- कागद वृक्षांच्या ओंडक्यांच्या सालींपासून
 बनवला जातो. जेवढा कागद बनवावा लागतो.
 तेवढे वृक्ष तोडावे लागतात. कागदाच्या
 अतिवापराने मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होते.
 जंगलतोड झाल्यावर हवामानबदलासारखी
 संकटे येतात. म्हणून कागद वाचवणे, ही
 काळाची गरज आहे.
--------------------------------------------------
(३) राजस्थानमध्ये घरांना पांढरा रंग का
      देतात ?
---  राजस्थानमध्ये वातावरणाचे तापमान खूप
 जास्त असते. पांढऱ्या रंगामुळे आपाती उष्णता
 प्रारणाचे मोठ्या प्रमाणावर परावर्तन होऊन
 उष्णतेचे शोषण कमी प्रमाणात होते. म्हणून
 राजस्थानमध्ये घरांना पांढरा रंग देतात.
--------------------------------------------------
(४) उन्हाळ्यात लोंबकळणा-या टेलिफोनच्या
     तारा हिवाळ्यात समांतर झालेल्या
     दिसतात.
--- उन्हाळ्यात वातावरणाचे तापमान जास्त
 असते. तेव्हा उष्णतेने प्रसरण झाल्यामुळे
 टेलिफोनच्या तारा लोंबकळतात. हिवाळ्यात
 वातावरणाचे तापमान कमी असते. तेव्हा
 तारांचे आकुंचन झाल्याने त्या समांतर होतात.        
===========================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
            जि.प.प्रा. शाळा जामनेपाडा.
           केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
             ९४२२७३६७७५

1 comment: