माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 15 July 2019

असे करूया शैक्षणिक सहलींचे नियोजन

  शैक्षणिक सहलीचे महत्त्व फारच आहे.
सहलींमधून विविध प्रकारचे अनुभव येत
असतात. हे अनुभव घेण्यासाठी शिक्षकांनी
सहलीपूर्वी यांचे नियोजन करावे. सहली
कशा काढाव्यात, सहलींचे प्रकार इत्यादी
माहितीचे नियोजन करावे लागते.

 ● शालेय सहलींचे वर्गीकरण --

(१) शालेय आवारातील सहली :--
    ▪ शाळेची बाग
    ▪ वस्तंसंग्रहालय

(२) गावातील सहली :--
      ▪ पोस्ट,  बॅक,  दुकाने, वीटभट्टी,
        सहकारी संस्था, मंदिर, बाजार,
       पतसंस्था, ग्रामपंचायत  (ग्रामसेवक,
      तलाठी, पोलीसपाटील भेट )

(३) लहान सहली :--
      ▪ १० किमी अंतरापर्यंत ऐतिहासिक,
       धार्मिक सांस्कृतिक, भौगोलिक,
       शैक्षणिक, धरण, पाणीपुरवठा,
        वस्तंसंग्रहालय, शेती केंद्रे, औद्योगिक
        केंद्र  इ.

(४) मोठ्या सहली :-
     जिल्हयाबाहेर मोठी धरणे, अभयारण्ये
    थंड हवेची ठिकाणे, औद्योगिक केंद्रे
   नगर भेट, ऐतिहासिक स्थळे, सागर,
    तलाव, कालवे, शेती, लोकजीवन  इ.
------------------------------------------------
■  A . सहलीचे नियोजन --
   1. विद्यार्थ्यांना सहलीचे महत्त्व सांगणे.
   2. शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या चर्चेतून
     सहलीचे नियोजन करावे.
  3.वेळ, खर्च, सोई, शैक्षणिक फायदा या
    सर्व मुद्द्यांचा सखोल विचार करावा.

■ सहलीची पूर्वतयारी --
   1. सहलीच्या ठिकाणांची यादी निश्चित
      करावी.
   2. जाण्या - येण्याचा मार्ग, मुक्काची ठिकाणे,
      एकूण किती कि. मी. अंतर, त्या संदर्भातील
    पत्रव्यवहार इत्यादींचे नियोजन करावे.
  3. शाळा व्यवस्थापन करणाऱ्या प्रशासनाची
     परवानगी घ्यावी.
   4. शाळाचालकांची, पालकांचे संमतीपत्रक,
     सहलीला येणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी,
     ओळखपत्रक (आयकार्ड )
  5. जाण्यासाठी लागणाऱ्या साधनांची व्यवस्था,
     सवलती पत्रव्यवहार. (रेल्वे, ए. टी. )
6. प्रत्येक विद्यार्थ्याला येणारा खर्च किती  ?
   प्रवासात एकूण खर्च किती होणार  ?
   या संदर्भात पैशांचा अंदाजे आकडा.
--------------------------------------------------

■ शिक्षकांची व विद्यार्थ्यांची तयारी :--
   1. सहलीतून आपण काय काय पाहणार
     आहोत त्या ठिकाणाची सर्वसामान्य माहिती.
  2. शैक्षणिक सहलींचा उद्देश विद्यार्थ्यांना
     सांगणे आवश्यक.
  3. शिस्तीविषयी नियम, गटप्रमुख काही
     कामे विभागून वाटून द्यावीत.
  4. सोबत औषधे, मंजन, आंघोळ, केशरचना
     करण्याचे इ. साहित्य घेण्यास सूचना
    द्याव्यात.
  5. शाळेच्या बादल्या, घागर, सतरंजी इत्यादी
     वस्तू घेण्याचे नियोजन
  6. नोंदी घेण्यास वह्या किंवा डायरी, पेन
       इत्यादी साहित्य घेण्यास सांगणे.
----------------------------------------------------

■ प्रात्यक्षिक सहल (प्रत्यक्ष सहल ):--
    1. विद्यार्थ्यांची सर्वतोपरी काळजी
      शिक्षकांनी घ्यावी.
   2. विद्यार्थ्यांनी गट पाडून गटा - गटाने
       निरीक्षण करावे.
  3. खाणे, पिणे, नाष्टा,जेवण, चहा यांची
      व्यवस्था नीट पाहावी. कारण आरोग्य
     बिघडले तर सर्व सहलीवर परिणाम
     होण्याची शक्यता असते.
  4. नियोजनाप्रमाणे सहलीची कार्यवाही
     करावी. मध्येच नियोजन बदलू नये किंवा
     कोणच्या सांगण्यावरून बदलू नये.
  5. संबंधित ठिकाणांचा मार्गदर्शक घेऊन
      माहिती मिळवावी.
   6. योग्य स्थळांचे फोटो काढावेत.
   7. या सर्व बाबींचा विचार करून सहलीचे
      नियोजन करून सहली काढाव्यात.
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा.शिक्षक)
           पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
            ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment