विषय -- मराठी भाषा
(१) आंब्याच्या झाडांची -- राई
(२) उंटांचा -- तांडा
(३) करवंदाची -- जाळी
(४) किल्ल्यांचा -- जुडगा
(५) केसांचा -- झुबका
(६) केसांची -- बट, जट
(७) केळ्यांचा -- लोंगर, घड
(८) खेळाडूंचा -- संघ
(९) गवताचा -- भारा
(१०) गवताची -- पेंढी, गंजी
(११) गुरांचा -- कळप
(१२) गाईगुरांचे -- खिल्लार
(१३) चोरांची -- टोळी
(१४) जहाजांचा -- काफिला
(१५) द्राक्षांचा -- घड, घोस
(१६) दुर्वाची -- जुडी
(१७) धान्याची -- रास
(१८) नाण्याची -- चळत
(१९) नारळांचा -- ढीग
(२०) नोटांचे -- पुडके
(२१) पक्ष्यांचा -- थवा
(२२) प्रश्नपत्रिकांचा -- संच
(२३) पालेभाजीची -- गड्डी , जुडी
(२४) पुस्तकांचा, वह्यांचा --गठ्ठा
(२५) पोत्यांची, नोटांची -- थप्पी
(२६) फुलझाडांचा -- ताटवा
(२७) फुलांचा -- गुच्छ
(२८) बांबूचे -- बेट .
(२९) भाकर्यांची -- चवड
(३०) मडक्यांची -- उतरंड
(३१) माणसांचा -- जमाव
(३२) मुलांचा -- घोळका
(३३) मुंग्यांची -- रांग
(३४) मेंढ्यांचा -- कळप
(३५) लाकडांची, ऊसाची -- मोळी
(३६) वस्तूंचा -- संच
(३७) विटांचा, कलिंगडांचा --- ढीग
(३८) विद्यार्थ्यांचा -- गट
(३९) विमानांचा -- ताफा
(४०) वेलींचा -- कुंज
(४१) काजूंची, माशांची -- गाथण
(४२) साधूंचा -- जथा
(४३) सैनिकांचे / ची -- पथक, तुकडी
(४४) हरिणांचा -- कळप
(४५) हत्तींचा -- कळप
(४६) प्रवाशांची -- झुंबड
(४७) पिकत घातलेल्या आंब्याची -- अडी
(४८) वाद्यांचा -- वृंद
===========================
संकलक - शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे
📞९४२२७३६७७५
शिक्षकांचा काय असतो
ReplyDelete