चंदा आता इंग्रजी शिकू लागली
आईला मदर
आणि वडीलांना फादर म्हणू लागली
बहिणीला सिस्टर
आणि भावाला ब्रदर म्हणू लागली || १||
चंदा आता इंग्रजी शिकू लागली
टोपीला हॅट
आणि चटईला मॅट म्हणू लागली
मांजरीला कॅट
आणि उंदराला रॅट म्हणू लागली ||२||
चंदा आता इंग्रजी शिकू लागली
पोपटाला पॅरट
आणि गाजरला कॅरट म्हणू लागली
चेंडूला बाॅल
आणि बाहुलीला डाॅल म्हणू लागली ||३||
चंदा आता इंग्रजी शिकू लागली
घंट्याला बेल
आणि विहिरीला वेल म्हणू लागली
सूर्याला सन
आणि बंदूकीला गन म्हणू लागली ||४||
चंदा आता इंग्रजी शिकू लागली
चंद्राला मून
आणि दुपारला नून म्हणू लागली
कोंबडीला हेन
आणि लेखणीला पेन म्हणू लागली ||५||
चंदा आता इंग्रजी शिकू लागली
कोंबड्याला काॅक
आणि कुलूपाला लाॅक म्हणू लागली
नाकाला नोझ
आणि गुलाबाला रोझ म्हणू लागली ||६ ||
चंदा आता इंग्रजी शिकू लागली
माशाला फिश
आणि ताटलीला डिश म्हणू लागली
ओठाला लिप
आणि मेंढीला शिप म्हणू लागली ||७||
चंदा आता इंग्रजी शिकू लागली
टाचणीला पिन
आणि डब्याला टिन म्हणू लागली
चहाला टी
आणि समुद्राला सी म्हणू लागली ||८||
चंदा आता इंग्रजी शिकू लागली
कोल्हयाला फाॅक्स
आणि खोक्याला बाॅक्स म्हणू लागली
हाताला हॅन्ड
आणि जमिनीला लॅन्ड म्हणू लागली ||९||
चंदा आता इंग्रजी शिकू लागली
धरणाला डॅम
आणि मेंढ्याला रॅम म्हणू लागली
आगगाडीला ट्रेन
आणि पाऊसाला रेन म्हणू लागली ||१०||
चंदा आता इंग्रजी शिकू लागली
झोपडीला हट
आणि कापण्याला कट म्हणू लागली
नळाला टॅप
आणि नकाशाला मॅप म्हणू लागली ||११||
चंदा आता इंग्रजी शिकू लागली
रेषेला लाईन
आणि नऊला नाईन म्हणू लागली
थंडला कूल
आणि लोकरला वूल म्हणू लागली ||१२||
चंदा आता इंग्रजी शिकू लागली
पैशाला मनी
आणि मधाला हनी म्हणू लागली
थाळीला प्लेट
आणि पाटीला स्लेट म्हणू लागली ||१३||
चंदा आता इंग्रजी शिकू लागली
भाताला राईस
आणि बर्फाला आईस म्हणू लागली
भिंतीला वाॅल
आणि उंचला टाॅल म्हणू लागली ||१४||
===========================
लेखन/कवी - शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे
📞९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment