माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 22 July 2019

" नाण्यांचा इतिहास " जाणून घेऊया  !

 आपण जो पैशांचा विनिमय करतो. या
विनिमयाचे साधन नाणे असते. या नाण्यांचा
उद्बोधक इतिहास जाणून घेऊ या. तसेच
नाण्यांची निर्मिती, त्यांचा संग्रह व त्याबद्दलची
मनोरंजक माहिती विषयी चर्चा करूया.

(१) छत्रपती शिवाजी महाराजांनी तांब्याची
    ' शिवराई ' आणि सोन्याचा  ' होन ' ही
     नाणी प्रचारात आणली.

(२) भारत सरकारने १ एप्रिल १९५७ पासून
  नाण्यांवर तीन सिंहांची राजमुद्रा प्रतिष्ठापित
  केली.

(३) स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने
    पाच रुपये, दहा रूपये,  वीस रूपये,
    पन्नास रूपये, शंभर रुपये अशी भारी
   किमतीची नाणी काढली. तसेच एक पैसा,
   दोन पैसे, तीन पैसे, पाच पैसे, दही पैसे,
   वीस पैसे ही नाणीही काढली.

(४) १९५७ मध्ये भारत सरकारने पै - आणा
     - रूपया ही चलनपद्धती रद्द करून रूपया
    आणि त्याचा शंभरावा भाग असणारा नया
    पैसा ही विनिमय पद्धती अंमलात आणली.
    त्यामुळे  १ एप्रिल १९५७ या दिवसापासून
    १ नया पैसा, २ नये पैसे, ५ नये पैसे, १० नये
    पैसे, २५ नये पैसे व ५० नये पैसे ही नवी
    नाणी प्रचारात आली.

(५) स्वतंत्र भारत सरकारने दशमान व शतमान
    पद्धतीची परिमाणे वापरायचा निर्णय घेतला.
   तो १ एप्रिल १९५७ पासून अमलात आणला.
  नाण्यावरील ब्रिटिश सत्ताधीशांचे मुखवटे काढून
   त्या जागी तीन सिंहांची राजमुद्रा प्रतिष्ठापित
  केली.  १९५७ मध्ये जुनी पै - आणा - रूपया
  ही चलनपद्धती रद्द केली. त्या बदल्यात रूपया
 आणि त्याचा शंभरावा भाग असणारा नया
 पैसा ही विनिमय पद्धती अमलात आणली.
 अशा प्रकारे स्वतंत्र भारत सरकारने चलनव्यवस्थेत
 बद्दल करून नवी नवी प्रचारात आणली.

(६) दशमान - शतमान पद्धती --
  ब्रिटिश राजवटीमध्ये भारतात पै - आणा - रूपया
  ही चलनपद्धती होती. रुपयाचा सोळावा भाग
  म्हणजे आणा. चवली म्हणजे दोन आणे. पावली
  म्हणजे चार आणे व अधेली म्हणजे आठ आणे.
 रूपया म्हणजे सोळा आणे. ही चलनपद्धती
 विनिमयास कठीण असल्यामुळे स्वतंत्र भारताने
 दशमान व शतमान ही सोपी पद्धत अमलात
 आणली. रुपयाचा शंभरावा भाग म्हणजे एक
 नया पैसा असे १०० नये पैसे म्हणजे रूपया.
 २५  नये पैसे म्हणजे चार आणे. ५० नये म्हणजे
 आठ आणे. दशमानपध्दती ही जागतिक
 पातळीवरही विनिमयास सुलभ आहे.
==========================
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
              ९४२२७३६७७५
 

No comments:

Post a Comment