अपृष्ठवंशीय सजीव आणि पृष्ठवंशीय सजीव
यांची माहिती जमवून प्राण्यांची वैशिष्ट्ये सांगा / लिहा.
● अपृष्ठवंशीय सजीव --
अपृष्ठवंशीय सजीव म्हणजे पाठीचा कणा नसलेले सजीव होय.
उदा. अमीबा, गांडूळ, गोगलगाय.
(१) अमीबा --
अमीबा हा एकपेशीय सजीव आहे. अमीबा
हा अतिसूक्ष्म जलचर व रंगहीन प्राणी आहे. याला
विशिष्ट आकार नसतो. हा प्राणी नुसत्या डोळ्यांनी
दिसत नाही. त्याला सूक्ष्मदर्शकाखाली पहावे लागते.
(२) गांडूळ --
गांडूळ हा अपृष्ठवंशीय सजीव जमिनीत बिळे
करून राहतो. जमिनीतील सेंद्रिय घटकावर जगतो.
तसेच हा प्राणी जमिनीची उत्पादनक्षमता वाढविण्यास
मदत करतो. याची त्वचा गुळगुळीत असते.
(३) गोगलगाय --
गोगलगाय हा सर्वत्र म्हणजे जमिनीवर, गोड्या
पाण्यात व समुद्रात आढळणारा प्राणी आहे. एकच
आखूड पाय असणारा व मंद गतीने चालणारा हा
प्राणी आहे.
===============================
● पृष्ठवंशीय सजीव --
पृष्ठवंशीय सजीव म्हणजे पाठीचा कणा असलेले सजीव होय.
उदा. मासा, हरिण, बेडूक.
(१) मासा --
मासा हा जलचर प्राणी आहे. याला
कल्ले व पाठीचा कणा असतो. कल्ल्याच्याद्वारे तो
श्वासोच्छवास करतो. याच्या अंगावर खवल्यांची
कातही असते.
(२) हरीण --
हरणाला चार पाय असतात. दोन डोळे व
लहान शेपूटअसते. त्याचा रंग सोनेरी असतो.
त्याच्या अंगावर पांढरे ठिपके असतात. हरीण
जमिनीवरील हिरवे गवत खातो.
(३) बेडूक --
बेडूक हा जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी
वावरतो. म्हणून तो उभयचर प्राणी आहे. याला चार
पाय असतात. हा आकाराने लहान असतो. याचे
डोळे बटबटीत व त्वचा खडबडीत असते.
==============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
Than sir your answer is very useful 😌😌
ReplyDeleteNice
ReplyDeleteThank you sir