माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 12 October 2019

वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व

      निरनिराळ्या प्रकारचे रोग विविध
रोगकारक सूक्ष्मजीवांमुळे होत असतात.
साथीच्या रोगांच्या वेळी अनेकांना रोगाचा
प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तसेच
संसर्गजन्य आणि संपर्कजन्य रोगांचा प्रसारही सूक्ष्मजीवांमार्फत होत असतो. विविध जीवाणू
आणि विषाणू , अस्वच्छ परिसर, दूषित पाणी
आणि वाईट सवयीमुळे साथीचे रोग पसरत
असतात.  उदाहरणार्थ, उघड्यावर थुंकणे,
शौच किंवा लघवी करणे यांमुळे परिसरात
रोगजंतूंचा पैलाव होतो. क्षयरोगाचे जीवाणू ,
रोग्याच्या धुंकीतून हवेत शिरकाव करतात.
अशी दूषित हवा इतर निरोगी माणसांना
क्षयरोगी बनवू शकते. उघडे अन्न, बाजारी
अन्नपदार्थ यांवर बसलेल्या घरमाश्या विषमज्वर, काॅलरा, अतिसार, हगवण, कावीळ अशांसारख्या विकारांना जलद गतीने पसरवतात. या सर्व
रोगराईला टाळायचे असेल तर वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व प्रत्येकाने लक्षात
घेतले पाहिजे.
            स्वच्छता राखण्याचे उपाय केल्यास
रोगराईला प्रतिबंध होऊ शकतो. यासाठीच
प्रत्येकाने वैयक्तिक आणि सार्वजनिक
स्वच्छतेबद्दल सजग राहिले पाहिजे. कोठेही उघड्यावर न थुंकणे व उघड्यावर मलमूत्रविसर्जन
न करणे, कचरा न फेकणे अशा वैयक्तिक
स्वच्छतेच्या बाबी पाळणे महत्त्वाचे आहे.
             तसेच अन्न कोठेही उघडे न ठेवणे,
भाजीपाला स्वच्छ धुणे,,पाणी व उकिरडा
साचू न देणे, परिसर स्वच्छ ठेवणे, आजारी
असल्यास सार्वजनिक ठिकाणी न जाणे अशा उपायांनी रोगराईला आळा बसेल. म्हणूनच
उत्तम आरोग्यासाठी वैयक्तिक आणि सार्वजनिक
स्वच्छतेचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे.

=============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक )
           पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
           ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment