(१) दक्षिणायन
--- सूर्याचे दक्षिणेकडे जाणे.
(२) रणगाडा
--- तोफ असलेला गाडा.
(३) स्थानबद्ध
--- एकाच ठिकाणी राहण्याची सक्ती केलेला.
(४) अजातशत्रू
--- ज्याला शत्रू नाही असा.
(५) ऋणानुबंध
--- पूर्वजन्मीचे लागेबांधे.
(६) अंगाई
--- मुलाला झोपण्यासाठी म्हटलेले गीत.
(७) हटवादी
--- आपल्या मताप्रमाणे चालणारा.
(८) आबालवृद्ध
--- लहानापासून थोरापर्यत.
(९) मनमिळाऊ
--- सर्वांशी मिळून -मिसळून वागणारा.
(१०) समाजकंटक
--- त्रास देणारे समाजातील लोक.
(११) यथाशक्ती
--- शक्य असेल त्याप्रमाणे.
(१२) सुखलोलुप
--- सुखाच्या मागे लागलेला.
(१३) लखपती
--- लाखो रुपये जवळ असलेले.
(१४) अल्पसंतुष्ट
--- थोडक्यात समाधान मानणारा.
(१५) कंजूष
--- वाजवीपेक्षा कमी खर्च करणारा.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment