गाय
गाय हा पाळीव प्राणी आहे. गाईचा रंग पांढरा, तांबूस किंवा काळा असतो. गाईला चार पाय व दोन शिंगे असतात. तिथे शेपूट गोडेदार असते. गाईचे डोळे काळेभोर व टपोरे असतात.
गाय सरकी पेंड व आंबोण खाते तसेच गवत व कडबाही खाते. गुराखी गाईंना चारायला रानातही नेतात घरी गाईंना गोठयात बांधून ठेवतात. गाईच्या ओरडण्याला हंबरणे' असे म्हणतात.
गाय हा अत्यंत उपयुक्त प्राणी आहे. गाईपासून आपल्याला दूध मिळते. लहान मुलांना ते दूध विशेष पौष्टिक ठरते गाईच्या शेणाने घरे सारवतात. तसेच शेणाच्या गोवन्या करून त्यांचा जळण म्हणून उपयोग करतात. गाय स्वभावाने गरीब असते. गाईला पवित्र मानतात.
==================================
मोर
मोर हा पक्षी फार सुंदर आणि डौलदार असतो. त्याची मान निळी व उच असते. त्याच्या डोक्यावर छानदार तुरा असतो पण त्याचे पाय कुरुप व उंच असतात. मोराचा पिसारा वजनदार व लांबलचक असतो. या पिसान्यातील प्रत्येक पिसावर निळे, हिरवे, जाभळे, सोनेरी असे विविध रंग असतात. त्यामुळे प्रत्येक पिसावर डोळ्याची आकृती तयार झालेली दिसते.
मोर रानात राहतो. तो धान्यकण व कीटक खातो. तो फार उंच उड्ड शकत नाही. पावसाळी ढगांना पाहून मोर आपला पिसारा पसरतो. आणि आनंदाने नाचू लागतो. नाचणारा मोर अतिशय विलोभनीय दिसतो. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.
==================================
वाघ
वाघ हा जंगली प्राणी आहे. तो बलवान असतो आणि क्रुर असतो. तो आकाराने लांबट असतो. त्याचे शेपूट लांब असते. त्याचे पंजे मोठे व मऊ असतात पण पंजांची नखे मात्र तीक्ष्ण असतात. त्याचे डोळे तेजस्वी असतात. पट्ट्या वाघ, बिबट्या वाघ, चित्ता वाघ अशा वाघांच्या काही जाती आहेत.
वाघ जंगलात गुहेत राहतो. तो जंगलातील प्राण्याची शिकार करुन खातो. कधी कधी गावात शिरुर गुरांना खातो. कधी कधी माणसावरही हल्ला करतो.वाघाचे ओरडणे फार दूरवर ऐकू जाते. त्याच्या ओरडण्याला 'डरकाळी' असे म्हणतात. त्याच्या डरकाळीने सारा आसमंत हादरुन जातो.
=====================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र -- रोहोड , ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
Raj Nitin Lahane
ReplyDelete