माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

3280902

Sunday, 26 September 2021

शब्द मैत्री ( समानार्थी शब्द )


कन्या मुलगी लेक
जीवन जल उदक
स्तुती प्रशंसा कौतुक
कांचन सुवर्ण कनक

दागिना अलंकार भूषण
निष्णांत तरबेज प्रवीण
जवानी तारूण्य यौवन
पुष्प कुसुम सुमन

नारी स्त्री महिला
सौदामिनी तडिका चंचला
बिजली विद्युत चपला
लक्ष्मी रमा कमला

जिव्हाळा माया ममता
आई माय माता
जनक बाप पिता
काळजी फिकीर चिंता

चाणाक्ष चतुर हुशार
सुरेख छान सुंदर
शक्ती सामर्थ्य जोर
आपुलकी आस्था आदर

कल्याण क्षेम हित
निपुण तरबेज पारंगत
संपदा संपत्ती दौलत
धैर्य धाडस हिंमत

निवास सदन भवन
चिन्ह निशणी खूण
नेत्र लोचन नयन
गौरव अभिनंदन सन्मान
============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री , जि. धुळे
९४२२७३६७७५

1 comment: