ब्लॉग भेटी.
Wednesday, 22 September 2021
म्हणजे काय ? ( एका शब्दाबद्दल शब्दसमूह )
(१) अतिथी --- घरी पाहुणा म्हणून आलेला.
(२) अभूतपूर्व
--- पूर्वी कधीही न घडलेले.
(३) आदिवासी
--- अगदी पूर्वीपासून राहणारे मूळ निवासी.
(४) उत्क्रांती
--- हळूहळू होणारा बदल.
(५) उभयचर
--- जमिनीवर व पाण्यात दोन्ही ठिकाणी राहू शकणारा.
(६) आशीर्वाद
--- थोरांनी लहानांच्या प्रति व्यक्त केलेली सदिच्छा.
(७) अविवाहित
--- ज्याचा विवाह झाला नाही असा.
(८) आंतरराष्ट्रीय
--- राष्ट्राराष्ट्रांमधील संबंध असणारे.
(९) जिवलग
--- जिवाला जीव देणारा.
(१०) काठवत
--- भाकरी करण्याची लाकडी परात.
(११) खट्याळ
--- नेहमी खोडी काढणारा.
(१२) जलचर
--- पाण्यात राहणारे.
(१३) जिज्ञासू
--- जाणून घेण्याची इच्छा असणारा.
(१४) दंतकथा
--- तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट.
(१५) निराधार
--- कुणाचाही आधार नसणारा.
(१६) परावलंबी
--- दुस-यावर अवलंबून असणारा.
(१७) दीर्घायू
--- भरपूर आयुष्य असणारा.
(१८) धर्मान्तर
--- एका धर्मातून दुस-या धर्मात जाणे.
(१९) पुरोगामी
--- आधुनिक विचारांचा दृष्टीकोन असणारा.
(२०) पोरका
--- आईवडील नसलेला.
(२१) पूरग्रस्त
--- पुरांमुळे नुकसान झालेले लोक.
(२१) प्रेक्षक
--- पाहण्यास जमलेले लोक.
(२२) भूचर
--- जमिनीवर राहणारा.
(२३) माथाडी
--- डोक्यावरून ओझे वाहून नेणारा.
(२४) वाटाड्या
--- वाट दाखवणारा.
(२५) सत्याग्रह
--- अन्यायनिवारणार्थ सत्याचा आग्रह धरणे.
(२६) सूत्र
--- मोजक्या शब्दांत सांगितलेले तत्व.
(२७) वनचर
--- वनात राहणारे प्राणी.
(२८) अतिवृष्टी
--- खूप पाऊस पडणे.
(२९) शुक्लपक्ष
--- चांदण्या रात्रीचा पंधरवडा.
(३०) भुयार
--- जमिनीखालील गुप्त मार्ग.
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा..शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र -- रोहोड , ता. साक्री, ता. धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे ...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment