माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 8 September 2021

शब्द सोबती ( समानार्थी शब्द )


भूमी म्हणजे जमीन
अरण्य म्हणजे रान
जंगल म्हणजे वन
पर्ण म्हणजे पान

फूल म्हणजे सुमन
ढग म्हणजे घन
जल म्हणजे जीवन
वारा म्हणजे पवन

ऊर्ण म्हणजे ऊन
आकाश म्हणजे गगन
दिवस म्हणजे दिन
संपत्ती म्हणजे धन

देह म्हणजे तन
तोंड म्हणजे वदन
मासा म्हणजे मीन
आहार म्हणजे भोजन

तृषा म्हणजे तहान
नेत्र म्हणजे लोचन
डोळा म्हणजे नयन
नमन म्हणजे वंदन

पूजा म्हणजे अर्चन
मुलगा म्हणजे नंदन
सोने म्हणजे कांचन
महा म्हणजे महान

तरूण म्हणजे जवान
तारूण्य म्हणजे यौवन
निर्बंध म्हणजे बंधन
घर म्हणजे सदन

गृह म्हणजे भवन
विद्वान म्हणजे बुध्दिमान
कट म्हणजे कारस्थान
करमणूक म्हणजे मनोरंजन

पुरातन म्हणजे प्राचीन
शत्रू म्हणजे दुश्मन
हत्या म्हणजे खून
ओसाड म्हणजे निर्जन
=================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

1 comment: