ब्लॉग भेटी.
Friday, 3 September 2021
आपली ज्ञानेंद्रिये ( घटना -- ज्ञानेंद्रिये )
आपल्याला निरनिराळ्या गोंष्टीचे ज्ञान देणा-या, माहिती देणा-या शरीराच्या अवयवाला ज्ञानेंद्रिये म्हणतात.
डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिये आहेत.
● खालील घटना कोणत्या ज्ञानेंद्रियांमुळे कळतात ते लिहा.
(१) कैरीचा रंग हिरवा आहे.
उत्तर -- डोळे
(२) ढगांचा गडगडाट होत आहे.
उत्तर -- कान
(३) अत्तराचा वास छान आहे.
उत्तर - नाक
(४) भाजीत मीठ जास्त झाले आहे.
उत्तर -- जीभ
(५) रस्ता खूप तापला आहे.
उत्तर -- त्वचा
(६) पावसामुळे बाग हिरवी झाली आहे.
उत्तर -- डोळे
(७) भेळ आंबट आहे.
उत्तर -- जीभ
(८) आभाळात इंद्रधनुष्य आहे.
उत्तर -- डोळे
(९) संत्रे आंबट आहे.
उत्तर -- जीभ
(१०) कोकीळ गात आहे.
उत्तर -- कान
(११) रेडिओवर छान गाणे लागले आहे.
उत्तर -- कान
(१२) घरात सुवासिक फुले आणली आहेत.
उत्तर -- नाक
(१३) कापूस मऊ आहे.
उत्तर -- त्वचा
(१४) कैरी आंबट आहे.
उत्तर -- जीभ
(१५) झाडांची पाने हिरवी आहेत.
उत्तर -- डोळे
(१६) आंबा गोड आहे.
उत्तर -- जीभ
(१७) काकडीची कोशिंबीर कडू झाली आहे.
उत्तर -- जीभ
(१८) गादी मऊ मऊ आहे.
उत्तर -- त्वचा
(१९) साखर गोड आहे.
उत्तर -- जीभ
(२०) कारल्याची चव कडू आहे.
उत्तर -- जीभ
================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे ...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
Good test
ReplyDelete