माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 10 September 2021

घरदर्शक, समूहदर्शक, पिल्लूदर्शक शब्द प्रश्नावली



(१) सिंह कोठे राहतो ?
उत्तर -- गुहेत

(२) कोकरू कोणाचे ?
उत्तर -- मेंढीचे

(३) मोळी कशाची ?
उत्तर -- लाकडांची

(४) काफिला कोणाचा ?
उत्तर -- जहाजांचा

(५) खोपा कोणाचा ?
उत्तर -- सुगरण

(६) करडू कोणाचे ?
उत्तर -- शेळीचे

(७) संघ कोणाचा ?
उत्तर -- खेळाडूंचा

(८) पुडके कशाचे ?
उत्तर -- नोटांचे

(९) पाडस कोणाचे ?
उत्तर -- हरणाचे

(१०) थवा कोणाचा ?
उत्तर -- पक्ष्यांचा

(११) घड कशाचा ?
उत्तर -- द्राक्षांचा

(१२) शिंगरू कोणचे ?
उत्तर -- गाढवाचे

(१३) कळप कोणाचा ?
उत्तर -- हरणांचा

(१४) माणूस कोठे राहतो ?
उत्तर -- घरात

(१५) वासरू कोणाचे ?
उत्तर -- गाईचे

(१६) खुराडे कोणाचे ?
उत्तर -- कोंबडीचे

(१७) लेकरू कोणाचे ?
उत्तर -- माणसाचे

(१८) ढोली कोणाची ?
उत्तर -- घुबडाची

(१९) बछडा कोणाचा ?
उत्तर -- वाघाचा

(२०) गुच्छ कशाचा ?
उत्तर -- फुलांचा

(२१) पिल्लू कोणाचे ?
उत्तर -- मांजरीचे

(२२) रेडकू कोणाचे ?
उत्तर -- म्हशीचे

(२३) जाळी कशाची ?
उत्तर -- करवंदाची

(२४) पेंढी कशाची ?
उत्तर -- गवताची

(२५) बाळ कोणाचे ?
उत्तर -- माणसाचे

(२६) गठ्ठा कशाचा ?
उत्तर -- पुस्तकांचा

(२७) वृंद कशाचा ?
उत्तर -- वांद्यांचा

(२८) छावा कोणाचा ?
उत्तर -- सिंहाचा

(२९) बीळ कोणासाठी ?
उत्तर -- उंदीर

(३०) जुडगा कशाचा ?
उत्तर -- किल्ल्यांचा
=================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment