✓ सरळव्याजाविषयी महत्त्वाचे
1 ) जी रक्कम व्याजाने घेतली जाते तिला मुद्दल म्हणतात.2 ) व्याजाने घेतलेल्या रकमेच्या वापराबद्दलचा मोबदला म्हणजे व्याज होय.
3 ) व्याजाने घेतलेली रक्कम ज्या कालावधीसाठी वापरली जाते त्यास मुदत म्हणतात.
4) व्याजाने घेतलेल्या रकमेवर दर शेकडा जे व्याज दयावे लागते त्यास व्याजदर म्हणतात.
5 ) व्याज व मुद्दल यांची बेरीज म्हणजे रास होय.
6) दामदुप्पट म्हणजे मुद्दलाएवढेच व्याज होय.
स = सरळव्याज I Interest
म = मुद्दल = P = Principal
द = दर = R Rate
क = मुदत = N = Number Of Years
रा = रास = A = Amount
==========================
संकलक :-शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड ता. साक्री, जि. धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment