माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Thursday 23 March 2017

पाण्याचे नियोजन करायला हवे !

   🔹पाण्याचे नियोजन करायला हवे !
  
  पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र
होत चालली आहे. अर्थात, जगातल्या इतर
देशांच्या तुलनेमध्ये आपल्या देशात पावसाचं
पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं.
तरीदेखील पाण्याची टंचाई आपल्याला
जाणवते. पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे
पिण्याच्या पाण्याचे स्रोत कमी कमी होत
चालले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे
स्रोत आणि पाण्यामुळे आरोग्यावर होणारे
परिणाम यासंदर्भात जागरूकता निर्माण
करण्याची गरज आहे.
  पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी
आपण पाण्याचं पुनर्चक्रीकरण करणं आणि
पाण्याचा अपव्यय टाळणं आवश्यक आहे.
पाणी टंचाईची समस्या ही पाण्याच्या स्त्रोतांचा
नियोजनबद्ध वापर न  केल्यामुळे निर्माण होते,
ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. दरवर्षी
सुमारे चौदाशे सेंटिमीटर इतका प्रचंड पाऊस
पडूनही चेरापुंजीतसुध्दा पाण्याची टंचाई
जाणवते , हे त्याचंच द्योतक आहे.
   पूर्वी टाक्या, तळी, विहिरी, अशा ठिकाणी
पावसाचं पाणी साठवण्याची ,पाणी जमिनीमध्ये
मुरवण्याची पध्दत होती.  या पध्दतीकडे आपण 
दुर्लक्ष करत आहोत .भारतात दरवर्षी सुमारे १००
तास पाऊस पडतो. हे पाणी साठवलं आणि
जास्तीत जास्त  पाणी जमिनीमध्ये मुरवलं तर
पाणी प्रश्न निश्चितपणे सुटू शकतो. त्यासाठी 
आपण प्रत्येक थेंबाचं महत्त्व ओळखून पाणी
वाया जाऊ नये यासाठी प्रयत्न करणं
आवश्यक आहे.

   संकलन:- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                  पिंपळनेर ता.साक्री जिल्हा धुळे
                 📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment