माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Thursday 23 March 2017

एक थेंब पाण्याचे महत्त्व

एक थेंब पाण्याचा,आधार आहे जगण्याचा.

                      उपक्रम
        🔹एक थेंब पाण्याचे महत्त्व🔹

■गळणा-या नळाचे पाण्याचे थेंब मोजणे

● प्रत्येक थेंब पाणी मोजणे.

  एका गळणा-या नळातून किती प्रमाणात
पाणी फुकट जाते हे दर्शविणारी कृती :

  ●साहित्य :-     मोजमापक, स्टाॅपवाॅच,
गळणारा एक नळ(खराखुरा किंवा तात्पुरता
गळणारा )विद्यार्थ्यांनी गळणा-या नळाखाली
एक मिनिटभर मोजमापक ठेवावा व ते
पाणी एक मिनिटात किती जमेल ते
मोजमापकाच्या सहाय्याने बघावे. उदा.
समजा गळणा-या नळातून एका मिनिटात
५० मिली पाणी जमा झाले तर एका तासात
किती पाणी गोळा होईल ?(वाया जाईल )
ते विद्यार्थ्यांना मोजता येतील.
(५०×६० मि.=३००० मिली किंवा ३ लिटर)
एका दिवसात (३००० मिली) × २४ तास=
७२००० मिली किंवा ७२ लि.) साधारण
३ बादल्या पाणी एका गळणा-या नळातून
फुकट वाया जाते.

   जर गळणा-या एका नळातून एका
दिवसात ७२ लिटर पाणी वाया जात
असेल तर विद्यार्थी शाळेतील गळणा-या
सर्व नळांतून दिवसात, आठवड्यात आणि
महिन्याभरात किती पाणी वाया जाईल
याचा हिशेब मांडू शकतील.

 संकलक :-  शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
              पिंपळनेर
            ता.साक्री जिल्हा धुळे
        📞९४२२७३६७७५

             थेंब थेंब पाण्याचा,
        अनमोल ठेवा निसर्गाचा.

No comments:

Post a Comment