➖➖➖➖➖➖Ⓜ🅰🅿➖➖➖➖➖➖
नृत्यासंबंधी माहिती
(अ) नृत्याची अंगे :-
भारतीय संस्कृतीत नृत्याला खूप महत्त्व आहे. सण, उत्सव, समारंभ आणि आनंदाच्या प्रसंगी नृत्य करण्याची आपली खूप जुनी परंपरा आहे. नृत्यामध्ये पुढील ४ अंगे
महत्वाची आहेत.
(१) ताल :- ताल किंवा ठेका नृत्यासाठी खूप
महत्वाचा असतो. तालामुळे नृत्यात
सहजपणा आणि उत्स्फूर्तता येतो.
(२) भाव :- डोळे, हात, चेहर्याचे हावभाव,
चाल यामधून भाव व्यक्त होतो. यांत
अभिनयही केला जातो.
(३) रस :- सर्व भाव एकत्रितपणे नृत्याचा
' रस ' दाखवतात.
(४) आनंद :- नृत्यातून नृत्य करणाऱ्यास
तसेच पाहणाऱ्यास आनंद मिळतो.
( ब ) नृत्याचे प्रकार :-
भारतात अनेक नृत्यप्रकार आहेत. भारतात
अनेक प्रांत, भाषा, जीवनपद्धती आहेत.
त्यामुळे त्या -त्या प्रांतात वेगवेगळे नृत्यप्रकार
आढळतात. त्यांपैकी प्रमुख नृत्यप्रकार
पुढीलप्रमाणे आहेत.
(१) शास्त्रीय नृत्य :- भरतनाट्यम, कथ्थक,
ओडिसी, मणिपूरी, कथकली, कुचिपुडी,
मोहिनीअट्टम हे शास्त्रीय नृत्याचे प्रकार
आहेत.
(२) लोकनृत्य :- भारतात लोकनृत्य खूप
प्रकार आहेत. त्यापैकी भांगडा, रासलीला,
घूमर, गरबा, दांडिया,लेझीम,लावणी,कोळी,
बिहू असे लोकनृत्याचे प्रकार प्रसिद्ध आहेत.
(३)आदिवासी नृत्य:- भारताच्या विविध भागात
राहणाऱ्या आदिवासींची एक वेगळी जीवन-
पद्धती आहे. त्यांची बांबूनृत्य, झूम, झेमी,
हेजगिरी, संथाल, पैकी बस्तर, भोजाली,
पावरी, कोकणी हे आदिवासी नृत्याचे प्रकार
प्रसिद्ध आहेत.
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment