महत्त्वपूर्ण भौगोलिक टिपा
(१)सूर्यमालेतील ग्रहांना सूर्यापासून प्रकाश
व उष्णता मिळते.
(२)'बुध हा सूर्यमालेतील सूर्याला सर्वांत
जवळचा ग्रह आहे.
(३)सूर्यमालेत पृथ्वीनंतर येणारा 'मंगळ'
हा लालसर रंगाचा ग्रह दिसून येतो.
(४)'गुरू'हा सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह आहे.
(५) पृथ्वीवरून धुरकट निळसर दिसणार्या
'शनी' या ग्रहाभोवती आढळणारी कडी हे
शनी या ग्रहाचे वैशिष्ट्य होय.
(६) 'चंद्र' हा पृथ्वीचा उपग्रह आहे. ज्याप्रमाणे
पृथ्वी स्वत:भोवती फिरत फिरत सूर्याभोवती
प्रदक्षिणा पूर्ण करते, त्याचप्रमाणे चंद्र स्वत:
भोवती फिरत फिरत 'पृथ्वी' प्रदक्षिणा घालतो.
(७) चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा
५० मिनिटे उशिरा उगवतो.
(८)ज्या वेळी चंद्र व सूर्य यांच्या मध्ये पृथ्वी
येते त्या वेळी 'चंद्रग्रहण' लागते.
(९)ज्या वेळी सूर्य व पृथ्वी यांच्या मध्ये चंद्र
येतो त्या वेळी 'सूर्यग्रहण' लागते.
(१०) चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेस येते;तर
सूर्यग्रहण नेहमी अमावास्येस येते.
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प.प्रा.शाळा बांडीकुहेर
ता. साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment