वाद्य / वाद्यांची माहिती
संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर) धुळे
¤ ९४२२७३६७७५ ¤
(१) डमरू :-
--- वीतभर दंडगोल मध्यभागी दाबल्यासारखा
डमरूचा आकार असतो. याच्या दोन्ही तोंडावर
कातडे बसवलेले असते. दोन्ही तोंडावरील
कातडी सुतळीने एकमेकांशी सांधलेली असतात.
ही सुतळ मध्यभागी आवळून बांधलेली असते. मध्यभागी दोन लोंब्या बांधलेल्या असतात.
लोंब्यांच्या टोकाला मेणाची गोळी असते. वाद्य
हलवले की लोंब्या दोन्ही तोंडावर आपटतात
व आवाज येतो.
--------------------------------------------------
(२) तबला :-
-- हे एक तालवाद्य आहे. ही एक जोडी असते.
एकाला तबला म्हणतात, दुसर्याला डग्गा
म्हणतात. तबला लाकूड पोखरून तयार
करतात. डग्गा धातूचा असतो. त्याचा आकार
घुमटासारखा असतो. दोन्हींच्या तोंडावर कातडे
बसवतात. कातडे वादीने आवळून बनवतात.
तोंडावर मध्यभागी काळ्या रंगाच्या मिश्रणाचा
थर बसवतात. त्याला शाई म्हणतात.
--------------------------------------------------
(३) डफ :-
--डफ हे वाद्य जगभर प्रसिद्ध आहे. लाकडाच्या
पट्टीचे एक गोल कडे तयार करतात. त्याच्या
एका बाजूला कातडे ताणून बसवतात. डफ
वाजवताना तो छातीशी धरतात.डफावर पंजाने
थाप मारून नाद निर्माण करतात. पोवाडा,
तमाशा, लावणी नृत्य इत्यादींच्या वेळी डफ
वाजवला जातो.
---------------s. s. chaure ------------------
(४) तुणतुणे :-
-- हे एक तंतुवाद्य आहे. याची तार छेडल्यावर 'तुणतुण' असा आवाज येतो, म्हणून याला
'तुणतुणे ' म्हणतात. या वाद्यात एक पोकळ
लाकडी दंडगोल असतो. त्याच्या खालच्या
बाजूला चामडे बसवलेले असते. दंडगोलच्या
बाजूला एक गोल काठी जोडलेली असते.
दांडीच्या वरच्या टोकाला एक खुंटी असते.
दंडगोलच्या खालच्या टोकाला चामड्याच्या
मध्यभागी एक धातूची गोल चकती असते
खुंटीपासून या चकतीपर्यंत एक तार जोडलेली
असते. शाहीर, तमासगीर इत्यादी कलावंत
तुणतुण्याचा उपयोग करतात.
--------------------------------------------------
(५) बासरी :-
---हे एक फुंकवाद्य आहे. तोंडाने हवा फुंकून
हे वाद्य वाजवले जाते. हे वाद्य म्हणजे वेळूची
पोकळ नळी असते. हवा फुंकण्यासाठी या
नळीच्या एका टोकाला चपटा भाग तयार
करतात. हे बासरीचे मुख होय.बासरीवर काही
छिद्रे पाडलेली असतात. मुखाद्वारे हवा
फुंकल्यावर एकेक छिद्राची उघडझाप करून
स्वर निर्माण करतात.
--------------------------------------------------
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment