आपल्या मनातील कुतूहल (सामान्यज्ञान)
(१) उन्हात क्रिकेट खेळताना पांढरे कपडे
का घालतात ?
--- पांढरे कपडे उष्णता शोषून घेत नाहीत,
म्हणून उन्हात क्रिकेट खेळताना पांढरे
कपडे घालतात.
----------------------------------------------
(२) रहदारीच्या रस्त्याकडेला असलेल्या
झाडांची पाने मळकट का दिसतात ?
--- वाहनांतून निघणाऱ्या कार्बन डायआॅक्सा-
इडमुळे आणि धुळीमुळे झाडांची पाने
मळकट दिसतात.
-----------------------------------------------
(३) कंदिलाच्या खालच्या भागाला छिद्रे
कशासाठी केलेली असतात ?
--- अभिसरण प्रवाहामुळे कंदील व वातीला
हवेचा पुरवठा होण्यासाठी.
------------------------------------------------
(५) सौरचुलीतील भांड्यांना बाहेरून काळा
रंग का असतो ?
--- काळा रंग जास्त उष्णता शोषून घेतो,
म्हणून सौरचुलीतील भांड्यांना बाहेरून
काळा रंग असतो.
-----------------------------------------------
(६) आरोळी ठोकताना तोंडाभोवती विशिष्ट
प्रकारे हात का धरतात ?
--- आवाज न फाकता शक्य तितका सरळ
जावा म्हणून.
----------------------------------------------
संकलक:- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
जि.प.प्रा. शाळा - बांडीकुहेर
ता.साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment