ओळखा पाहू !
संकलन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे
¤ ९४२२७३६७७५ ¤
मुलांनो, आज आपण एक छान खेळ
खेळणार आहोत. तुम्हांला मी कोण आहे ?
ते ओळखायचे आहे. त्यासाठी तुम्हांला येथे
काही मुद्दे दिले आहेत, ते वाचा व मी कोण
ते सांगा.
(अ) १.मी रात्री आकाशात दिसतो.
२. लहान मुले मला मामा म्हणतात.
३. माझा आकार रोज बदलतो.
----------------------------------------------
(आ) १. मी गोल आहे.
२. तुम्ही माझ्याबरोबर खेळू शकता.
३. माझ्यामुळे इतर लोकांच्या खिडक्या
फुटणार नाहीत याची काळजी घ्या.
----------------------------------------------
(इ) १. मी आकाशात राहतो.
२. मी तुम्हांला 'ड' जीवनसत्व देतो.
३. माझ्याकडे एकटक पाहू नका.
-----------------------------------------------
(ई) १. मी मीठू मीठू बोलतो.
२. तुमची करमणूक करतो.
३. मला पिंजऱ्यात कोंडू नका.
------------------------------------------------
(उ)१. मी गोलाकार, पिवळसर आहे.
२. सरबत करताना माझा उपयोग होतो.
३. खोकला येत असेल तर मला खाऊ नका
-------------------------------------------------
(ऊ) १. मी हिरवा आणि तपकिरी आहे.
२. मी तुम्हांला फळे आणि फुले देतो.
३. मला तोडू नका.
----------------------------------------------
(ए) १. सगळ्यांना माझे वेड आहे.
२. करमणुकीबरोबर ज्ञानही देतो.
३. माझ्यासमोर तास न् तास बसू नका.
-----------------------------------------------
(ऐ) १. मी सगळ्यांशी संवाद साधतो.
२. तुमचा संदेश झटपट पोहोचवतो.
३. रात्री झोपताना मला खिशात ठेवू नका.
------------------------------------------------
उत्तरे :-(अ) चंद्र, (आ) चेंडू , (इ) सूर्य,
(ई) पोपट, (उ) लिंबू , (ऊ) झाड,
(ए) टी.व्ही. , (ऐ) मोबाईल.
----------------------------------------------
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment