विद्यार्थ्यांनो आपली कर्तव्य ध्यानी धरा
■ वैयक्तिक कर्तव्य :-
(१)स्वच्छ राहणे, प्रसन्न दिसणे या
आरोग्यविषयक सवयी स्वत:ला
लावून घेणे.
(२)समतोल आहार घ्यावा.
(३)व्यायाम करावा.
(४)आपले घर स्वच्छ व नीटनेटके ठेवावे.
(५)घरातील ओला व सुका कचरा वेगवेगळी
ठेवून त्याची योग्य विल्हेवाट लावावी.
(६)घरातील सर्वांशी आदराने व प्रेमाने वागावे.
(७)घरातील वृद्ध व अपंग व्यक्तींकडे विशेष
लक्ष द्यावे.
(८)घराबाहेरील परिसर स्वच्छ ठेवण्यास
हातभार लावावा.
■ सामाजिक कर्तव्य :-
(१)शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर
राखण्यात पुढाकार घ्यावा.
(२)शिक्षकांचा आदर करून त्यांनी सांगितलेला
अभ्यास व उपक्रम यांत उत्साहाने सहभागी
व्हावे.
(३)आजारी मित्रांची विचारपूस करून
त्यांना मदत करावी.
(४)सण व उत्सव साजरे करताना
ध्वनिप्रदूषणाबाबतच्या नियमांचे
पालन करावे.
(५)आपल्या परिसरातील पक्षी व प्राणी
यांना उपद्रव होणार नाही,याची काळजी
घ्यावी.
(६)आपल्या परिसरातील पाणीसाठे,नदी
दूषित होणार नाही,याची काळजी घ्यावी.
संकलक:- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment