माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 3 September 2017

जोडशब्द व त्यांची फोड

    जोडशब्द व त्यांची फोड

(१)घरोघरी -- प्रत्येक घरी

(२)पानोपानी --प्रत्येक पानात

(३)दारोदार --प्रत्येक दारी

(४)जागोजागी --प्रत्येक जागी

(५)गल्लोगल्ली -- प्रत्येक गल्लीत

(६)दरसाल --प्रत्येक वर्षी

(७)दररोज --प्रत्येक दिवशी

(८)गायरान --गाईंसाठी रान

(९)राजपुत्र --राजाचा पुत्र

(१०)राजवाडा -राजाचा वाडा

(११)वनभोजन --वनातील भोजन

(१२)ऋणमुक्त --ऋणातून मुक्त

(१३)सेवानिवृत्त --सेवेतून निवृत्त

(१४)नापसंत --पसंत नसलेला

(१५)नाइलाज --इलाज नसलेला

(१६)अशक्य --शक्य नसलेला

(१७)बेसावध --सावध नसलेला

(१८)पाणकोंबडा --पाण्यातील कोंबडा

(१९) हिरवागार --खूप हिरवा

(२०) पुरणपोळी --पुरण घालून केलेली पोळी

(२१)साखरभात --साखर घालून केलेला भात

(२२)लालभडक --खूप लाल

(२३)बहिणभाऊ --बहीण व भाऊ

(२४)पंधरासोळा --पंधरा किंवा सोळा

(२५)खरेखोटे --खरे किंवा खोटे

(२६)दिनक्रम --दिवसाचा क्रम

(२७)आम्रवृक्ष --आंब्याचा वृक्ष

(२८)घरजावई --घरचा जावई

(२९)सप्तसूर --सात सूर

(३०)पाऊलवाट --पावलांनी तयार झालेली वाट

(३१) क्रांतिकारक --क्रांती करणारा
 
संकलक:-- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                जि.प.प्रा.शाळा - बांडीकुहेर
                ता. साक्री जि.धुळे
                 📞९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment