सुट्टीचा अतिशय उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या
माझ्या बालमित्रानो आपली बुद्धीमत्ता
ओळखण्यासाठी आणि वाढविण्यासाठी
काही खेळ दिले आहेत. ते खेळा .काही
कृती करून बघा. इतरांची निरीक्षणं करा.
योग्यप्रकारे टी. व्ही.चा वापर करून बघा.
(१)कोणतेही मैदानी खेळ खेळा.
(२)गायन, वादन,नर्तन यांपैकी जे
आवडेल ते शिका.
(३)जोरात पळणे,संथ चालणे,सायकल
अशा वेगवेगळ्या शर्यती लावा.
(४)व्यायाम करा.
(५)नाच करा.
(६)कलाकुसरीची कामे,हस्तकलेच्या
वस्तू तयार करा.
(७)आपल्या गावात/सोसायटीत इतरांच्या
मदतीने एखादा कार्यक्रम स्वतः आखा.
उदा. स्वच्छता मोहीम /झाडं लावणं -
झाडं जगवणं.
(८)आजी -आजोबांचे अनुभव ऐका.
त्यांच्या लहानपणीविषयी,शाळेविषयी
माहिती काढा.
(९)घरात बसून टी. व्ही. बघण्यापेक्षा
बाहेर पडा.
(१०)पुस्तकांमध्ये खूप विविधता असते.
सगळे प्रकार बघा. चरित्र, जादूच्या
गोष्टी, विज्ञानविषयक, कविता इ.
(११)वाचलेल्या पुस्तकांविषयी कोणाशीतरी
बोला.
(१२)छोट्या मुलांना जमवून गोष्टी सांगा.
(१३)शब्दकोडी,चित्रकोडी सोडवा.
विविध भाषिक खेळ खेळा.
(१४)शक्य असल्यास नवीन भाषा शिका.
(१५)अंकांशी खेळा. फावल्या वेळात
गणिती कोडी सोडवा.
(१६)घरातल्या खर्चाचं अंदाजपत्रक तयार
करा. जमाखर्च लिहा.
(१७)लहानांना गणित शिकवा.
(१८)जेवढी झाडं,फळं,फुलं ओळखू
शकता त्या सर्वांविषयीची माहिती
देणारी वही तयार करा.
(१९)निसर्गातल्या सर्वच घटकांविषयी
सादर होणारे कार्यक्रम डिस्कव्हरी
चॅनलवर बघा.
(२०)बी लावा. तिचं रोप कधी येतं ते बघा.
त्याची वाढ कशी होते,याचं निरीक्षण करा.
(२१)चित्र काढायला आवडत असेल तर
बघून चित्र काढण्यापेक्षा मनाने
चित्र काढा.
(२२)वाद्य वाजवायला आवडत असेल
तर ते शिका.
(२३) आपल्या अभ्यासाचं मूल्यमापन स्वतःच करा.
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
ता. साक्री जि. धुळे
📞९४२२७३६७७५